चक्क सूर्य बोलल्याचा दावा, किरण बेदींनी शेअर केलेल्या VIDEO ची देशभर चर्चा

चक्क सूर्य बोलल्याचा दावा, किरण बेदींनी शेअर केलेल्या VIDEO ची देशभर चर्चा

एक व्हायरल व्हिडिओ शेअर केल्यानंतर देशाच्या पहिला महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना ट्रोल व्हावं लागलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : सोशल मीडियावर काहीही व्हायरल होत असतं. तसंच व्हायरल व्हिडिओ, फोटो यांची सत्यता पडताळून पाहणंही कधी कधी कठिण जातं. आता एक व्हायरल व्हिडिओ शेअर केल्यानंतर देशाच्या पहिला महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना ट्रोल व्हावं लागलं आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरून युजर्सनी किरण बेदींना ट्रोल करताना तुम्ही सिव्हिल परीक्षा कशी पास झालात असा प्रश्न विचारला आहे.

किरण बेदी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअऱ केला. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, नासाने सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. आणि सूर् ओम मंत्राचा उच्चार करतो. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर किरण बेदी यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. अनेक युजर्सनी किरण बेदींनी आयटी सेलचा व्हॉटसअॅप ग्रुप जॉइन केला का असा प्रश्न विचारला आहे.

शेअऱ केलेला व्हिडिओ एडिटेड आहे. नासाने त्यांच्या युट्यूब चॅनेलवर 2018 मध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता. Sounds of the Sun असा कॅप्शन असलेला व्हिडिओ आता पुन्हा एडिट करून व्हायरल होत आहे.

किरण बेदींनी शेअर केलेल्या व्हिडिओत ॐ उच्चाराचा ऑडिओ बॅकग्राउंडला नंतर लावण्यात आला आहे.

उधारीचा मंत्र्याला फटका, पंपचालकाने पेट्रोल न दिल्यानं बसने प्रवास करण्याची वेळ; पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: January 4, 2020, 3:14 PM IST
Tags: kiran bedi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading