जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'त्या' अवयवामुळे तरुणीला एकही लाइफ पार्टनर मिळेना; म्हणे, 'तिथं नजर जाताच पुरुषांनाही वाटते लाज'

'त्या' अवयवामुळे तरुणीला एकही लाइफ पार्टनर मिळेना; म्हणे, 'तिथं नजर जाताच पुरुषांनाही वाटते लाज'

'त्या' अवयवामुळे तरुणीला एकही लाइफ पार्टनर मिळेना; म्हणे, 'तिथं नजर जाताच पुरुषांनाही वाटते लाज'

एका सवयीमुळे तरुणीची लव्ह लाइफ उद्ध्वस्त झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्राझिलिया, 22 एप्रिल : कुणी लठ्ठ आहे, कुणी सडपातळ आहे, कुणाला एखादा अवयव नाही अशा शारीरिक उणीवा असतील तर बऱ्याचदा लाइफ पार्टनर मिळणं मुश्किल होतं. एका तरुणीसाठीही तिचं शरीर तिच्या लव्ह लाइफमध्ये सर्वात मोठी अडचण ठरलं आहे. पण तिचं कारण थोडं वेगळं आहे. तिचं शरीर पाहिल्यानंतर पुरुषांनाही लाज वाटते. त्यामुळे तिला लाइफ पार्टनर मिळत नाही आहे. ब्राझीलमध्ये राहणारी 34 वर्षांची ऐने लिमा. जिने आपल्या लव्ह लाइफची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ऐने फिटनेस फ्रिक आहे. पण तिचा हाच फिटनेस तिच्या लव्ह लाइफमध्ये अडथळा झाला आहे. जिममध्ये हेवी वर्कआऊट केल्याने ऐनेचं लव्ह लाइफ उद्ध्वस्त झालं आहे. तिचं शरीर असं बनलं आहे की आता त्यामुळे कोणताच पुरुष तिच्यासोबत डेट करण्यासाठी उत्सुक नाही. हे वाचा -  कारमधून येत होता विचित्र आवाज; बोनेट उघडताच मॅकेनिकला फुटला घाम ऐने 13 वर्षांपासून ती जीममध्ये जाते. आठवड्याचे चार दिवस जिममध्ये वर्कआऊट करते. यामुळे तिचे पाय खूप मजबूत झाले आहेत. तिने स्वतःच्या पायाची तुलना झाडाच्या खोडासारखी केली आहे. लेग्स वर्कआउटमुळे तिच्या पायाचे मसल्स खूप मजबूत झाले आहेत. असे पाय पाहून प्रत्येक पुरुष तिच्यासमोर स्वतःला कमजोर समजतो आणि तिच्याजवळ जातच नाही. न्यूयॉर्क पोस्ट च्या रिपोर्टनुसार ऐने म्हणाली, तिच्या आयुष्यात असे बरेच पुरुष आले जे तिच्याकडे आकर्षित झाले. पण जेव्हा ते तिला भेटतात तेव्हा त्यांना लाज वाटते. कित्येक पुरुषांचे पाय सडपातळ होते. हे वाचा -  आपल्याच मैत्रिणीच्या जुळ्या मुलांचा बाप बनणार आहे हा व्यक्ती; पत्नीला समजताच ओढावलं मोठं संकट एकदा एका व्यक्तीने तिला रस्त्यात रोखलं आणि तिच्या पायाला हात लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीला ते थोडं विचित्र वाटलं पण आपल्या  ताकदीबाबत विचार करून तिला अभिमान वाटतो, असंही तिने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात