नवी दिल्ली, 13 एप्रिल : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास गोष्ट असते. या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी लोक काहीतरी नवीन आणि हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर लग्नामधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक असे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अचानक लग्नसमारंभातील स्टेजला आग लागल्याचं पहायला मिळालं. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवरी स्टेजवर डान्स करत आहे. यादरम्यान स्टेजवर केलेल्या सजावटीला आग लागली. त्यानंतर लग्नसमारंभात गोंधळ उडतो आणि लवकरात लवकर आग विझवण्यासाठी सर्वजण गर्दी करतात. त्याचवेळी नववधू मोठ्या आश्चर्याने त्याच ठिकाणी उभी राहून आगीकडे बघताना दिसते. आग विझवण्याच्या नादात एक मुलगा खाली पडतो. काही वेळात सर्वजण मिळून ती आग विझवण्यात यशस्वी होतात.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ veshu4600 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे. व्हिडीओ शेअर करताच काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालेला पहायला मिळाला. व्हिडिओला 90 हजारांहून अधिक लाईक्स आणि 24 लाखांहून अधिक वेळा 24 लाख वेळा पाहिले गेले आहेत. व्हिडीओवर अनेजण कमेंटही करताना पहायला मिळत आहेत.
दरम्यान, सध्या लग्नाचे अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर येत आहेत. ज्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. सहसा वधू आणि वर त्यांचे लग्न खास बनवण्यासाठी अनेक योजना आखतात. बहुतेक लग्नांमध्ये आता नववधू स्टेजवर येताना नाचताना दिसतात. त्याचबरोबर स्टेजवर अतिशय उत्तम सजावट करून फायर वर्क केले जाते. त्यामुळे अनेकदा आगीच्या घटना समोर येतात.

)







