जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आधी रिझर्व्ह कोचमध्ये घुसले, नंतर शिक्षकांसमोरच त्यांनी विद्यार्थ्यांना...; रेल्वेतील संतापजनक VIDEO

आधी रिझर्व्ह कोचमध्ये घुसले, नंतर शिक्षकांसमोरच त्यांनी विद्यार्थ्यांना...; रेल्वेतील संतापजनक VIDEO

रिझर्व्ह कोचमध्ये घुसून प्रवाशांचा गोंधळ.

रिझर्व्ह कोचमध्ये घुसून प्रवाशांचा गोंधळ.

मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी असलेल्या रिझर्व्ह कोचमध्ये काही प्रवाशांनी घुसखोरी केली.

  • -MIN READ Karnataka
  • Last Updated :

बंगळुरू, 27 ऑक्टोबर : मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा लांब पल्ल्याची एक्स्प्रेस रेल्वेमध्ये भांडणं, वादाची बरीच प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. अशाच एका एक्स्प्रेसमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. शिक्षक आणि विद्यार्थी असलेल्या एका रिझर्व्ह कोचमध्ये काही प्रवासी जबरदस्ती घुसले आणि त्यानंतर त्यांनी मुलांसोबत जे केलं ते धक्कादायक आहे. रेल्वेतील हा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधील ही घटना आहे. ही ट्रेन सीएसटीवरून सुटली. या ट्रेनमध्ये मुंबईच्या भांडुपमधील सेंट झेव्हियर्स शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक होते. मुंबईहून ते बंगळुरूला पिकनिकसाठी जात होते. रिझर्व्हेशन कोचमध्ये हे विद्यार्थी-शिक्षक होते. हे वाचा -  मोबाईलवर गप्पा मारत रेल्वे ट्रॅकवर गेली, तिथंच बसली; वरून धडधड करत गेली ट्रेन; भयानक VIDEO गाडी कर्नाटकच्या कलबुर्गी स्टेशनला पोहोचली आणि या रिझर्व्हेशन कोचमध्ये काही जनरल पब्लिक घुसले. रिझर्व्ह कोचमध्ये ते घुसले ते घुसले पण विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असलेल्या सीटवर जबरदस्ती बसू लागले. मुलांनाही ते त्रास देऊ लागले. शिक्षक त्यांना विनंती करत होते पण तरी ते एक ऐकत नव्हते. मुलंही या सर्व प्रकारामुळे घाबरली.

जाहिरात

रेल्वेतीलच एका प्रवाशाने ही सर्व घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रेल्वेत काही मुलंही दिसत आहेत. काही लोक सीटवर बसलेली आहे. खाली उभे असलेले लोक त्यांना खाली उतरायला सांगत आहेत. पण सुरुवातीला ते तसेच बसलेले दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात