अभिलाष मिश्रा, प्रतिनिधी इंदूर, 11 जुलै : इंदूरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण एकमेकांशी जोरदार भांडताना दिसत आहेत. ही घटना रविवारी रात्रीची असल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरा दोन्ही गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. या घटनेवेळी एकच गोंधळ उडाला होता. नेमकं काय घडलं - इंदूर शहरातील क्लबमध्ये रविवारी मोठी गर्दी पाहायला मिळते. यादरम्यान, याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाला तीनपेक्षा जास्त जणांनी मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीला धक्का लागल्यानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला. मारहाण झालेल्या तरुणाला घेऊन एक तरुणी पबमध्ये पोहोचली होती. परिस्थिती अशी होती की बाऊन्सरला येऊन हस्तक्षेप करावा लागला.
दोन्ही गटातील सदस्य मोठ्या प्रमाणात दारूच्या नशेत असल्याचेही सांगण्यात येत आहे. यावरून बराच वाद झाला होता. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली.
लसूड़िया पोलीस स्टेशन प्रभारी यांनी सांगितले की, व्हिडिओ एबी रोडजवळील कॉकटेल आणि ड्रीम्स पबच्या बाहेरचा आहे. पबमध्ये एका तरुणाचा एका तरुणीला धक्का लागला. या व्हायरल व्हिडिओच्या आधारे तरुणांचा शोध घेतला जात आहे. इंदूरमध्ये नाईट कल्चरचा मुद्दा आधीच चर्चेत आहे. याबाबत वेळोवेळी निषेध केला जातो.