जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शेतकऱ्याचा नादच खुळा! औषध फवारणीसाठी घेतोय चक्क हेलिकॉप्टर; वाचा, सविस्तर

शेतकऱ्याचा नादच खुळा! औषध फवारणीसाठी घेतोय चक्क हेलिकॉप्टर; वाचा, सविस्तर

डॉ. राजाराम त्रिपाठी

डॉ. राजाराम त्रिपाठी

डॉ.राजाराम त्रिपाठी यांनी सांगितले की, इंग्लंड आणि जर्मनीच्या वास्तव्यात त्यांनी हेलिकॉप्टरचा वापर औषधी आणि खते फवारणीसाठी केला असल्याचे पाहिले.

  • -MIN READ Local18 Chhattisgarh
  • Last Updated :

रामकुमार नायक, प्रतिनिधी बस्तर, 6 जुलै : छत्तीसगडमधील बस्तर हा नक्षलग्रस्त परिसर आहे. येथील कोंडागाव जिल्ह्यात राहणारे शेतकरी डॉ. राजाराम त्रिपाठी यांच्याकडे एक हजार एकर शेती आहेत. ही शेती सांभाळण्यासाठी ते हेलिकॉप्टर खरेदी करणार आहेत. तर राजाराम त्रिपाठी हे हेलिकॉप्टर खरेदी करणारे राज्यातील पहिले शेतकरी आहेत. त्यांनी हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशी 7 कोटी रुपये खर्चून खरेदी केल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा करारही केला आहे. वर्षभरात त्यांना R-44 मॉडेलचे 4 सीटर हेलिकॉप्टर मिळेल. डॉ. राजाराम त्रिपाठी यांनी न्यूज18 लोकलला सांगितले की, त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील आहे. त्यांचे आजोबा 70 वर्षांपूर्वी छत्तीसगडमधील बस्तर येथे आले होते. आता राजा राम यांची पाचवी पिढी बस्तरमध्ये राहते. राजाराम यांनी एलएलबी, अर्थशास्त्रात एमए आणि तीन संशोधन विषयांत डॉक्टरेट केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शेतकरी राजाराम त्रिपाठी हे माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुप चालवतात. ते पांढरी मुसळी, काळी मिरी आणि औषधी वनस्पतींची लागवड करतात. त्यांनी संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच त्यांना सुमारे 400 आदिवासी कुटुंबांसह 1000 एकरमध्ये यशस्वी सामूहिक शेतीसाठी पुरस्कार देण्यात आला. सेंद्रिय शेतीसाठी राष्ट्रीय स्तरावर अनेकवेळा त्यांचा गौरवही झाला आहे. त्याचबरोबर आपल्या शेतीत आणखी एक इतिहास रचत ते 7 कोटी रुपये खर्चून हेलिकॉप्टर खरेदी करणार आहेत. डॉ.राजाराम त्रिपाठी यांनी सांगितले की, इंग्लंड आणि जर्मनीच्या वास्तव्यात त्यांनी हेलिकॉप्टरचा वापर औषधी आणि खते फवारणीसाठी केला असल्याचे पाहिले. त्याचा परिणामही अधिक चांगल्या पद्धतीने मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शेतीसह आजूबाजूच्या शेती क्षेत्राची हेलिकॉप्टरद्वारे काळजी घेण्याचे ठरवले आणि हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशी करारही केला. राजाराम त्रिपाठी यांनी सांगितले की, ते एक कस्टमाइज्ड हेलिकॉप्टर बनवत आहे, जेणेकरुन त्यामध्ये मशीनही बसवता येतील. अनेक प्रकारचे कीटक पिकांचे नुकसान करतात आणि हाताने औषध फवारणी करूनही अनेक ठिकाणी पाणी सोडले जाते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. हेलिकॉप्टरमधून औषध फवारणी करून पिकांना पुरेशा प्रमाणात औषध टाकता येते, त्यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले. वार्षिक उलाढाल 25 कोटी - डॉ. राजाराम त्रिपाठी यांनी न्यूज18 लोकलला पुढे सांगितले की, त्यांची शेती आणि दंतेश्वरी हर्बल ग्रुपमधून त्यांच्या फर्मची वार्षिक उलाढाल सुमारे 25 कोटी रुपये आहे. आता त्यांच्यासोबतच आजूबाजूच्या भागातील आदिवासी शेतकरीही प्रगत शेतकऱ्यांच्या श्रेणीत आले आहेत. त्यांच्याकडून वनौषधींचे उत्पादनही केले जात आहे. यामध्ये पांढरी मुसळी आणि बस्तरच्या औषधी वनस्पतींचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात