Home /News /viral /

सिनेमा पाहायला थिएटरमध्ये आला Spider Man चा फॅन, महिलेचा प्रश्न ऐकून झाला गारद

सिनेमा पाहायला थिएटरमध्ये आला Spider Man चा फॅन, महिलेचा प्रश्न ऐकून झाला गारद

स्पायडर मॅनचा मुखवटा घालून गेलेल्या फॅनचा असा काही पोपट झाला की तो जन्मात कधी ही घटना विसरू शकणार नाही.

  न्यूयॉर्क, 20 डिसेंबर: स्पायडर मॅन नो वे होम (Spider Man – No way Home) हा सिनेमा पाहायला आलेल्या स्पायडर मॅनच्या फॅनला (Spider Man Fan) एका महिलेनं असा प्रश्न (Woman asked question) विचारला की त्यावर कसं रिऍक्ट व्हावं, हेच त्याला समजेना. सध्या स्पायडर मॅनचा नवा सिनेमा जगभरात रिलीज झाला आहे आणि बहुतांश थिएटर्समध्ये हा सिनेमा गर्दी खेचतो आहे. गेल्या काही वर्षात सातत्यानं लोकप्रिय ठरणाऱ्या नायकांमध्ये स्पायडर मॅनचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. स्पायडर मॅनचे डेडिकेट चाहते आहेत आणि नवा सिनेमा रिलीज होण्याची ते चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. सध्या रिलीज झालेला सिनेमा पाहण्यासाठी स्पायडर मॅनचा एक चाहता थिएटरमध्ये आला खरा, मात्र त्याचा एका प्रश्नाचे संतापच झाला. महिलेनं विचारला प्रश्न स्पायडर मॅनचा सिनेमा पाहण्यासाठी हा तरुण स्पायडर मॅनचा मास्क लावून आला होता. सिनेमा पाहायला जाताना एक प्रकारे वातावरण निर्मिती व्हावी आणि आपलं स्पायडर मॅनवर किती प्रेम आहे, हे इतरांना कळावं, यासाठी त्यानं हा वेष धारण केला होता. रस्त्याने जाताना सर्वजण त्याच्या या कल्पनेचं स्वागत करत होते आणि हात उंचावून त्याला प्रतिसादही देत होते. त्यामुळे भलताच खूष असणारा हा तरूण जेव्हा सिनेमाचं तिकीट काढण्यासाठी थिएटरमध्ये गेला, तेव्हा मात्र मोठी गंमत झाली.
  View this post on Instagram

  A post shared by Synpact (@synpct)

  तरुणाने मागितली दोन तिकीटे उत्साहात असणारा आणि चेहऱ्यावर स्पायडर मॅनचा मास्क चढवलेला तरुण तिकीट काउंटरपाशी गेला आणि त्याने सिनेमाची दोन तिकीट मागितली. त्यावर महिलेनं त्याला प्रश्न विचारला, ‘कुठल्या सिनेमाची?” या प्रश्नावर तरुण चांगलाच उडाला आणि त्यानं शेजारी उभ्या असणाऱ्या तरुणाकडे आश्चर्यांनं पाहिलं. हे वाचा - 8 मुलांची आई देणार नवव्या मुलाला जन्म, लोकांनी दिला फुटबॉल टीम बनवण्याचा सल्ला हा कसला प्रश्न? जर आपण स्पायडर मॅनचा मुखवटा घालून सिनेमा पाहायला आलो आहोत, तर साहजिकच आपण स्पायडरमॅन सिनेमाचंच तिकीट मागत आहोत, हे महिलेला कसं काय समजत नाही, अशा अर्थाचे एक्सप्रेशन्स त्याने दिले. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Movie release, Viral video.

  पुढील बातम्या