Home /News /viral /

हत्ती कारसमोर आल्यावर कारचालकाची उडाली तारांबळ; Forest Officer म्हणाला, अशावेळी 'ही' युक्ती वापरा

हत्ती कारसमोर आल्यावर कारचालकाची उडाली तारांबळ; Forest Officer म्हणाला, अशावेळी 'ही' युक्ती वापरा

एका कारचालकाच्या समोर हत्ती आपल्या बछड्यांसह आला. त्यावेळी त्याने कारला धडक दिली.

  नवी दिल्ली, 27 जून : महामार्गावर कारसमोर हत्ती आल्याने एका कारचालकाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर रस्त्यावर जाताना येताना रस्त्यात हत्ती (Elephant) समोर आला तर घाबरण्याचे कारण नाही. कारण त्यावर आता थेट भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यानेच (Forest Officer) उपाय सांगितला आहे. नेमकं काय घडलं - एका कारचालकाच्या समोर हत्ती आपल्या बछड्यांसह आला. त्यावेळी त्याने कारला धडक दिली. यावेळी कारचालक घाबरुन पळू लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होता. भारतीय वनसेवेतील अधिकारी सुसांता नंदा यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

  Elephant with calves are over protective and can charge at anything coming their way. Keep out of their way. In such situations, keep the vehicles engine on. They shall pass. VC: ⁦@BoskyKhannapic.twitter.com/1ocRF2Dbrw

  — Susanta Nanda IFS (@susantananda3) June 27, 2022 हेही वाचा - तुमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशीप टिकेल का? 6 सेकंदात या Optical Illusion मधून मिळेल उत्तर! वनसेवेतील अधिकाऱ्याने काय सल्ला दिला - हा व्हिडिओ शेअर त्यांनी लिहिले की, हत्ती जेव्हा आपल्या बछड्यांसोबत असतात तेव्हा अधिक संरक्षणात्मक असतात. तसेच यावेळी ते त्यांच्या वाटेवर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर हल्ला करू शकतात. अशावेळी त्यांच्या मार्गापासून दूर राहिले पाहिजे. कारसमोर जर हत्ती आपल्या बछड्यांसोबत आला तर अशा परिस्थितीत वाहनाचे इंजिन चालू ठेवावे. ते पास होतील, असा सल्ला भारतीय वनसेवेतील अधिकारी सुसांता नंदा यांनी दिला आहे. तर हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत पुष्टी होऊ शकली नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Car, Elephant, Forest

  पुढील बातम्या