नवी दिल्ली, 26 जुलै : प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, भावुक, स्टंट, विचित्र व्हिडीओ समोर येत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये म्हशींवर बसून कुत्रा आरामात स्वारी करताना दिसला. कुत्र्याचा थाट पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओनं सध्या इंटरनेटवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. कुत्रा म्हशीवर स्वार होऊन फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. दोन म्हशी रस्त्यावरुन चालल्या आहेत आणि एका म्हशीच्या अंगावर कुत्रा उभा राहिला आहे. त्याचा स्वॅग एखाद्या राजापेक्षा कमी नाही.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याने दोन म्हशी आरामात चालल्या आहेत. विशेष म्हणजे यातील एका म्हशीच्या अंगावर कुत्रा उभा राहिला आहे. म्हशीच्या अंगावर बसून एखाद्या राजासारखा हा कुत्रा प्रवास करताना दिसतोय. एकदम तोल सांभाळत हा कुत्रा आरामात फिरताना दिसतोय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओला पसंत करत आहेत. कुत्र्याचा थाट लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच थोड्याच वेळात व्हिडीओला अनेक व्ह्युज मिळाले. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसून आल्या. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. अधिक लोकांनी तो लाइक केला आहे.