मराठी बातम्या /बातम्या /Viral /घासून घासून महिलेने दातांची अक्षरशः लावली वाट; पाहून डेंटिस्टही झाले शॉक

घासून घासून महिलेने दातांची अक्षरशः लावली वाट; पाहून डेंटिस्टही झाले शॉक

एका डेंटिस्टने एका महिलेच्या दातांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका डेंटिस्टने एका महिलेच्या दातांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका डेंटिस्टने एका महिलेच्या दातांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई, 26 फेब्रुवारी : आपल्याला एका विशिष्ट प्रकारचं नाक, ओठ हवेत असं काही लोकांना वाटतं. त्यासाठी ते सर्जरीही करून घेतात. एक महिला तर याच्यापुढेही गेली तिने तर आपले दातही सोडले नाही (Woman file teeth). हवे तसे दात मिळावेत म्हणून तिने ते इतके घासले की त्यांची अक्षरशः वाट लागली. महिलेच दात पाहून डेंटिस्टही हैराण झाले (Teeth filing).

डेंटर थेरेपिस्ट लौरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात एका महिलेच्या दातांची अवस्था त्यांनी दाखवली आहे. या महिलेने तुर्कस्तानात जाऊन आपल्या दातांना फाइल करून घेतलं (Woman filed down teeth to spikes) आणि दात प्राण्यांसारखे करून घेतले.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार टिकटॉवर पोस्ट केलल्या व्हिडीओत डेंटिस्ड लौरा यांनी सांगितलं, महिलेचे दात खूप चांगले होते पण तिने त्यांना घासून त्यांची वाट लावली.

आता दर 15 वर्षांनी तिला आपले दात बदलावे लागणार. तिच्या सर्व दातांचं रूट कॅनल करावा लागणार. तिच्या दातांना आणखी ड्रिल करावं लागेल जेणेकरून ते रिप्लेस करता येतील. तिच्या दातांवर क्राऊन लावला जाणार जेणेकरून तिचे दात सामान्य दिसतील.

हे वाचा - दिसायला सुंदर तरी सिंगल! शेकडो तरुणांना डेट करूनही मॉडेलला मिळाला नाही पार्टनर

लौरा म्हणाल्या, दातांना फाइल करण्याचा ट्रेंड सेलेब्सनी बंद करायला हवा कारण सामान्य लोकांसाठी हे खूप तठीण जातं. सेलिब्रिटीसारखं दिसण्याच्या नादात ते आपल्या दातांची वाट लावतात.

आपण जी चूक केली ती इतरांनी करून नये, म्हणून लोकांना दातांना कधीच फाइल करू नये, असं आवाहन आपण लोकांना करणार असल्याचं या महिलेने सांगितलं.

हे वाचा - 'बुढिया के बाल'साठी ही व्यक्ती घेते माणसांच्या डोक्यावरील केस; VIDEO VIRAL

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. या महिलेचे दात चांगले होते, तिने खराब का केले, तिच्यासारखे दात माझे असते, तर मला आनंद झाला असता, अशा कमेंट युझर्सनी केल्या आहेत.

First published:

Tags: Health, Lifestyle, Viral