मराठी बातम्या /बातम्या /Viral /वयाच्या 57 व्या वर्षी सुरू केलं मॉडेलिंग, आर्मीमध्ये काम केलेल्या गीता प्रकाश कोण आहेत? कशी झाली Modelling मध्ये एन्ट्री

वयाच्या 57 व्या वर्षी सुरू केलं मॉडेलिंग, आर्मीमध्ये काम केलेल्या गीता प्रकाश कोण आहेत? कशी झाली Modelling मध्ये एन्ट्री

डॉ. गीता प्रकाश यांनी वयाच्या 57 व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला. भारतीय लष्कर आणि संयुक्त राष्ट्रात काम केलेल्या डॉ. गीता प्रकाश आज 67 वर्षांच्या आहेत.

डॉ. गीता प्रकाश यांनी वयाच्या 57 व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला. भारतीय लष्कर आणि संयुक्त राष्ट्रात काम केलेल्या डॉ. गीता प्रकाश आज 67 वर्षांच्या आहेत.

डॉ. गीता प्रकाश यांनी वयाच्या 57 व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला. भारतीय लष्कर आणि संयुक्त राष्ट्रात काम केलेल्या डॉ. गीता प्रकाश आज 67 वर्षांच्या आहेत.

  नवी दिल्ली, 4 एप्रिल : वय वाढल्यानंतर तुम्ही मॉडेल बनू शकत नाही, असं काही नाही. दिल्लीतील डॉ. गीता प्रकाश यांनी वयाच्या 57 व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला. भारतीय लष्कर आणि संयुक्त राष्ट्रात काम केलेल्या डॉ. गीता प्रकाश आज 67 वर्षांच्या आहेत. त्यांच्यासाठी मॉडेलिंगची संधी त्यांच्या डॉक्टरी पेशानेच मिळवून दिली. एका रुग्णावर त्या उपचार करत होत्या त्यावेळी एकदा बोलताना त्यांनी विचारले, ‘डॉक्टर तुम्हाला फोटोशूट करायला आवडेल का?’ डॉ. गीता प्रकाश म्हणतात, ‘त्यावेळी मी 57 वर्षांची होते आणि विचार केला या आधी मी कधी हे केलेलं नाही पण आता करून पाहायला हरकत नाही. आणि मी त्या प्रस्तावाला होकार दिला.

  डॉ. गीता प्रकाश जेव्हा सेटवर पोहोचल्या तेव्हा त्यांना समजलं की, त्या सेलिब्रिटी फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीसाठी मॉडेलिंग करणार आहेत. प्रकाश म्हणाल्या, ‘फोटोशूटदरम्यान मला दिलेले दागदागिने, पोषाख हे सगळं काही एकदम राजेशाही होतं. ती जाहिरात जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा मी माझ्या कुटुंबियांना याबद्दल सांगितलं. जाहिरात पाहून ते म्हणाले, आई तू तर फारच देखणी दिसत आहेस.’

  पहिल्या शूटिंगनंतर डॉ. प्रकाश यांना मॉडेलिंगच्या अधिक ऑफर आल्या. हार्पर बाजार, फेमिनासारखी फॅशन मॅगझिन्स आणि पर्सनल केअर ब्रँड डव्हच्या बिलबोर्डवर त्यांना स्थान मिळाले.

  हे वाचा - कशी लागते माणसाला दारूची सवय?, शास्त्रज्ञांनी शोधलं त्यामागचं Interesting कारण..!

  आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार-रविवारी त्या मॉडेलिंग करतात तर इतर दिवशी त्या डॉक्टर म्हणून काम करतात. हे सगळं शूटिंग करताना त्यांनी खरं तर कोणतंच नियोजन केलं नव्हतं किंवा कोणाकडे जाऊन काम मागितलं नव्हतं. काश्मीरमध्ये सुट्टीला गेल्या असताना डॉ. गीता यांनी हार्पर बाजारसाठी शूटिंग केलं होतं. त्यांच्या मुलीने जेव्हा फेसबुकवर त्यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला त्यानंतर डॉ. गीता यांना डव्हकडून फोन आला.

  मॉडेलिंगने त्यांना स्वातंत्र्याची जाणीव दिली असं डॉ. गीता प्रकाश म्हणतात. त्यालाच पुढे जोडून त्या म्हणतात, लोक म्हणतील, तू तर 57 वर्षांची मॉडेल आहेस. पण मी म्हणते, हो. त्यात काय वाईट आहे?’ आपल्या 61 व्या वाढदिवशी डॉ. गीता प्रकाश यांना एक खूप छान सरप्राईज मिळालं. त्यांचा फोटो फेमिना मॅगझिनच्या मुखपृष्ठावर छापून आला.

  हे वाचा - Noise Pollution: 6 कोटी भारतीयांच्या कानांचे झालेत वांदे; तरुणांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज

  डॉ. गीता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ‘कोणतंही नवीन स्वप्न पाहायला कधीही उशीर झालेला नसतो. ते साकारण्याची संधी कधी येईल, हे सांगता येत नाही. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज मला 61 व्या वाढदिवशी मिळालं. मॉडेल होण्यासाठी मी फारच ज्येष्ठ आहे, असं म्हणणाऱ्या लोकांकडे मी अजिबात लक्ष देत नाही. मी माझं काम करते आणि मजेत राहते.’

  First published:

  Tags: Indian army, Model