नवी दिल्ली, 29 जुलै : टोमॅटोपासून बनलेले पदार्थ अनेकांना खूप आवडतात. यामध्ये टोमॅटो सूप, सॉस, चटणी, ज्यूस या पदार्थांचे अनेक लोक सेवन करतात. एवढंच नाही तर दैनंदिन बनवणाऱ्या जेवणातही टोमॅटोचा वापर केला जातो. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी गोष्ट म्हणजे सॉस. चायनिस असो, पिझ्झा, सॅंडवीच, चपाती सर्वांसोबत सॉस आवडीनं खाल्ला जातो. मात्र हा टोमॅटो सॉस कसा बनवला जातो याविषयी तुम्हाला माहितीय का? टोमॅटो सॉस बनवतानाचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही परत टोमॅटो सॉसला हात लावताना दहा वेळेस विचार कराल किंवा हातही लावणार नाही. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये कारखान्यातील काही दृश्य दिसत आहे. यामध्ये टोमॅटो सॉस बनवण्याची काही प्रक्रिया दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही किळस येईल. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ माजवत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टोमॅटो कारखान्याबाहेर पडले आहेत. टोमॅटो ट्रकमध्ये ठेवले असून ते सडलेले दिसत आहेत. आता या कुजलेल्या टोमॅटोपासून सॉस बनवायचा आहे की फेकून देण्यासाठी काढले आहेत हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नाहीय. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत.
हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून लोक नाराजी, संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आजपासून टोमॅटो सॉस खाणं बंद’. नेटकरी कमेंट करत म्हणत आहेत, हे किळसवाणं आहे, काहींनी म्हटलं टोमॅटो फेकून देण्यासाठी बाहेर काढले असावेत.