नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : काम करण्याची जिदद् आणि मेहनत असेल तर माणूस कोणतंही काम करु शकतो. त्याच्यासाठी कोणतंही काम अवघड नाही. सोशल मीडियावर तर अनेक लोकांच्या संघर्षाच्या गोष्टी व्हायरल होत असतात. अनेकांना यापासून प्रेरणा, नवी जिद्द देखील मिळते. अशातच आणखी एका तरुणाच्या संघर्षाच्या कहानीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीदेखील त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. सध्या ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक अपंग डिलिव्हरी बॉय दाखवण्यात आला आहे. त्यांचा हा प्रवास कोणत्याही सामान्य माणसाला प्रेरणा देण्यासाठी पुरेसा आहे. लोक व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि शेअरही करत आहेत. झोमॅटोने ट्विट करून त्याला त्यांचा हिरो म्हटले आहे.
Hats off to this man #Zomato #zomatoindia pic.twitter.com/36AyCdcPsB
— Himanshu (@himanshuk783) February 8, 2023
छोटीशी दुखापत झाली तर आ आणण आपले काम अनेक वेळा पुढे ढकलतो. अनेक वेळा हे निमित्त काढून चांगल्या संधीपासून आपण मुकतो. पण व्हिडिओमध्ये दिसणारी ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच धीर देईल. शारीरिक व्यंगत्त्वाला मागे टाकून स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी बॉयची ही कथा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य अनेकांना धीर देत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, गाडी चालवत व्हीलचेअरवर बसलेली एक व्यक्ती आपल्याच नादात पुढे जात असल्याचं दिसत आहे. त्याने झोमॅटोचा टी-शर्ट घातला असून हेल्मेटही घातले आहे. जेव्हा त्या मुलाला कळते आपल्या कोणीतरी रेकॉर्ड करत आहे तेव्हा तो कॅमेराला एक सुंदर स्मितहास्य करतो. व्हिडीओमध्ये तो थंम्स अप करतानाही दिसत आहे.
हिमांशू नावाच्या ट्विटर युजरने @himanshuk783 अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून त्या तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्याच्या हिमतीला दाद दिली जात आहे. व्हिडीओवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटदेखील पहायला मिळत आहे.