Home /News /viral /

'Ek aur selfie lene do' म्हणत पुन्हा आली Dhinchak Pooja; तिचा नवा Song Video पाहिलात का?

'Ek aur selfie lene do' म्हणत पुन्हा आली Dhinchak Pooja; तिचा नवा Song Video पाहिलात का?

ढिंच्याक पूजा 'सेल्फी मैंने लेली आज' या आपल्या पहिल्या गाण्याचं रिबूट व्हर्जन घेऊन आली आहे.

मुंबई, 11 मे : तुम्हाला ढिंचॅक पूजाचं (Dhinchak Pooja) 'सेल्फी मैंने लेली आज' हे व्हायरल गाणं (Viral Song) आठवतं का? काही वर्षांपूर्वी क्रिंज-पॉप स्टारच्या (Cringe-Pop Star) या गाण्यानं इंटरनेटवर (Internet) तुफान लोकप्रियता मिळवली होती. आता काही वर्षानंतर पूजा याच गाण्याचं रिबूट व्हर्जन (Reboot Version) घेऊन परत आली आहे. 'एक और सेल्फी लेने दो' हे गाणं घेऊन पूजा पुन्हा सोशल मीडियावर आली आहे. ‘सेल्फी मैंने लेली आज’ या पहिल्या गाण्यातून लोकप्रियता मिळवलेल्या पूजाला बिग बॉसमध्ये (Bigg Boss) एंट्री मिळाली होती. तिने ‘स्वॅग वाली टोपी’ आणि ‘बापू देदे थोडा कॅश’ सारखी गाणीही गायली आहेत. याशिवाय, 2020 मधील लॉकडाउनदरम्यान कोरोना व्हायरसबाबत (Coronavirus) जनजागृती करणाऱ्या गाण्याच्या (Awareness Song) माध्यमातूनही तिनं लोकांचं मनोरंजन केलं होतं. आता पूजानं आपल्या पहिल्या गाण्याचं रिबूट व्हर्जन तयार केलं आहे. 8 मे रोजी रिलीज झालेल्या या नवीन व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या गाण्यावर अनेक विनोदी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं अनुष्का शर्माचं सुईधागा चित्रपटातील मीम शेअर करत पूजाला 'बिग फॅन मॅम' असं म्हटलं आहे तर आणखी एका युजरनं तिची खिल्ली उडवली आहे. 'हॅलो पूजा, या जगात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. लवकरातलवकर आणखी एक गाणं रिलीज करा म्हणजे बाकीचे सर्व प्रॉब्लेम्स क्षुल्लक वाटू लागतील,' अशी कमेंट या युजरनं केली आहे. हे वाचा - तोंडाला पाणी सुटण्याऐवजी चढला रागाचा पारा; Flying Dahi Vada Video पाहून भडकले नेटिझन्स पूजानं ‘सेल्फी मैने लेली आज’ या गाण्यातून प्रसिद्धी मिळवली होती. ते जेव्हा पहिल्यांदा रिलीज झालं होतं तेव्हा लाखो व्ह्युज मिळाले होते. अशा प्रकारचं गाणंही एक दिवस येईल आणि प्रसिद्ध होईल याची कल्पना कुणीच केली नसेल पण एका कौशल्यवान म्युझिक कंपोजरनं (Music Composer) या वर्षाच्या सुरुवातीलाच असं गाणं सादर करण्याचं अशक्य काम शक्य करून दाखवलं. इन्स्टाग्रामवर संगीतकार मयूर जुमानी (Mayur Jumani) यानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पूजासोबत जॅमिंग (Jamming) करताना दिसत आहे. बॅकग्राउंडला पूजाचा एक जुना व्हिडिओ स्क्रीनवर प्ले होताना दिसत आहे. मयूरने शोमध्ये तिचं स्वागत केल्यानंतर ती 'यो पीपल' म्हणून लोकांना ग्रीट करत आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये मयूरनं सेल्फी गाण्याचा मूळ व्हिडिओ वापरला आहे. परंतु, त्याला त्यानं आपल्या संगीताची जोड दिली आहे. एडिटिंगमुळे (Editing) नवीन आणि जुन्या व्हर्जनमध्ये फारच फरक दिसत आहे. खरं सांगायचं झाल्यास पूर्वीच्या गाण्यामध्ये अजिबात सूर किंवा व्हॉईस मॉडरेशन (Voice Moderation) नव्हतं. पण, आता पूजाचा आवाज एडिट केला गेला आहे जेणेकरून ती मयूरचं व्हर्जन तालासुरात गाताना दिसत आहे. हे वाचा - काय म्हणावं याला! 135 मुलांचा बाप, 125 नातवंडांचा आजोबा; 28 बायकांसमोर बांधली 37 वी लगीनगाठ मयूरच्या कौशल्यानं फॅन्स नक्कीच प्रभावित झाले आहेत. एका फॅननं कमेंट केली आहे की, त्याला पहिल्यांदालाच सेल्फी साँग म्युझिकल वाटलं. तर, आणखी एका फॅननं म्हटलं आहे, 'मयूरनं ढिंचॅक पूजाचं गाणं ठीक करण्याचा प्रयत्न करून मोठी जबाबदारी घेतली आहे. त्यानं हे काम व्यवस्थित पार पाडलं आहे.' ढिंचॅक पूजा आणि मयूरच्या या रिबूट व्हर्जनला इंटरनेटवर चांगली प्रसिद्धी मिळत आहे.
First published:

Tags: Social media viral, Song, Viral, Viral videos

पुढील बातम्या