
युकेतील डेडमन बेट गेल्या कित्येक वर्षांपासून सामान्य लोकांना माहितच नव्हतं. मात्र गेल्या काही वर्षांत समुद्राच्या पातळीत झालेल्या बदलांनंतर आता लोकांना हे बिच दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या बेटावर सगळीकडे मानवी हाडं पसरलेली आहेत.

युकेतील केंटजवळ असणाऱ्या या बिचवर फारच कमी नागरिक पोहोचू शकले आहेत. याचे फोटो पाहिल्यानंतर ही जागा खरी नाही, असं कदाचित तुम्हाला वाटेल. मात्र ही जागा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे.

या बेटावर सगळीकडे मानवी कवट्या आणि हाडं विखुरलेली असतात. त्यामुळे याला डेड आयलंड असं म्हटलं जातं. या बेटावर मानवी दातदेखील इतस्ततः पडलेले दिसतात.

ससेक्सलाईव्हनं दिलेल्या वृत्तानुसार सुमारे 200 वर्षांपूर्वी या जागी कैद्यांचे मृतदेह दफन केले जात असत. मात्र त्यानंतर समुद्राची पातळी बदलली आणि ही जागा पाण्याखाली गेली होती.

आता पुन्हा समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हे बेट लोकांना दिसू लागलं आहे. याचेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.




