जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नाचतायेत की हाणामारी करतायेत; वऱ्हाड्यांचा Dance Video पाहून तुम्हीही असंच म्हणाल

नाचतायेत की हाणामारी करतायेत; वऱ्हाड्यांचा Dance Video पाहून तुम्हीही असंच म्हणाल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

लग्न म्हटल्यावर धम्माल, मजा आलीच. दोन कुटुंब एकत्र होण्याचा आनंद, नव्या आयुष्याची सुरुवात त्यामुळे लग्नामध्ये आनंदाचं आणि भावुक असं संमिश्र वातावरण पहायला मिळतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 मार्च : लग्न म्हटल्यावर धम्माल, मजा आलीच. दोन कुटुंब एकत्र होण्याचा आनंद, नव्या आयुष्याची सुरुवात त्यामुळे लग्नामध्ये आनंदाचं आणि भावुक असं संमिश्र वातावरण पहायला मिळतं. लग्नामध्ये नवरदेव नवरी मुलीपासून कुटुंब, नातेवाईक, मित्र-मंडळी सर्वत्र आनंदात थिरकताना दिसतात. बऱ्याच लग्नांमधील भन्नाट व्हिडीओही सोशल मीडियावर फिरताना दिसतात. असाच एक लग्नामधील हटके आणि विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोणाच्या तरी लग्नाची मिरवणूक निघत आहे, त्यामुळे लोक डीजेच्या तालावर नाचत आहेत. दरम्यान, काही मुले पेंढ्या घेऊन नाचू लागतात. मुलं एकमेकांना पेंढ्या मारायला लागतात. हा डान्स पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

जाहिरात

MEMES KI DUKAN नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळाला. व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंटही आल्या. आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोशल मीडियावर लग्नातील भरपूर व्हिडीओ व्हायरल झाले असतील. मात्र सध्याचा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडीओ पाहून तरुण नक्की डान्स करताय की हाणामारी करताय हेही कळणार नाही. असे अनेक मजेशीर व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात