जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गावात घुसली मगर, सापाला तोंडात दाबले, नेमकं काय घडलं? VIDEO

गावात घुसली मगर, सापाला तोंडात दाबले, नेमकं काय घडलं? VIDEO

घटनास्थळाचे दृश्य

घटनास्थळाचे दृश्य

नदीतून एक मगर बाहेर येऊन गावात पोहोचली.

  • -MIN READ Local18 Jhansi,Uttar Pradesh
  • Last Updated :

शाश्वत सिंह, प्रतिनिधी झाशी, 27 जून : पावसाळा सुरू होताच काही ठिकाणच्या लोकवस्तीच्या परिसरात मगरी येण्याच्या घटना समोर येत असतात. उत्तरप्रदेशातील झाशीतही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मगरीने लोकवस्तीच्या परिसरात घुसून साप गिळला. मगर बराच वेळ सापाला तोंडात धरून बसली. ही घटना झाशीच्या चिरगावच्या धमना गाव परिसरातील आहे. यावेळी रस्त्यावर मगर पाहिल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. काय आहे संपूर्ण घटना -  ही घटना झाशीच्या चिरगाव येथील धमना गावातील पच्चरगड मौजा येथील आहे. येथून वाहणाऱ्या बेटवा नदीतून एक मगर बाहेर येऊन गावात पोहोचली. काही काळ मगर गावात फिरत राहिली. त्यानंतर मगरीने एक साप तोंडात दाबला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, याठिकाणी आधी मगरीच्या भीतीने गावकरी तिच्या जवळ येत नव्हते. मात्र, काही वेळाने गावातील काही लोकांनी मगरीची शेपूट धरून तिच्यासोबत खेळण्यास सुरुवात केली.

वनविभागाने घेतले ताब्यात - दरम्यान, या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. यानंतर माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मगरीला पकडून परत बेटवा नदीत सोडले. झाशीचे विभागीय वन अधिकारी एम.पी.गौतम यांनी सांगितले की, चिरगाव रेंजमधील नदीतून मगर बाहेर आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मगरीला ताब्यात घेऊन पुन्हा नदीत सोडले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात