जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालत्या मेट्रोत व्यक्तीचा जीवघेणा स्टंट; जबरदस्ती दरवाजा उघडायला लावत केलं भयानक कृत्य

चालत्या मेट्रोत व्यक्तीचा जीवघेणा स्टंट; जबरदस्ती दरवाजा उघडायला लावत केलं भयानक कृत्य

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

काहीतरी वेगळं आणि हटके करण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांना याच्या परिणामांनाही सामोरं जावं लागलं आहे. याचे लाइव्ह फोटो आणि व्हिडीओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जानेवारी : आपलं दैनंदिन जीवन खूप धावपळीचं असतं. या धावपळीच्या जगात वावरताना, एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी आपण मेट्रो, ट्रेन, बस, टॅक्सीचा सहसा वापर करतो. मात्र प्रचंड गर्दीमुळे प्रवास करताना सावधानता बाळगण्याची गरज असते. अन्यथा अपघात होऊ शकतात. गडबड केल्यामुळे किंवा काहीतरी वेगळं आणि हटके करण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांना याच्या परिणामांनाही सामोरं जावं लागलं आहे. याचे लाइव्ह फोटो आणि व्हिडीओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. तुम्ही भारतातील दिल्ली, लखनऊ किंवा मुंबई मेट्रोसारख्या कोणत्याही मेट्रोने प्रवास करत असाल तर तुम्ही ही सूचना नक्कीच ऐकली असेल. ती म्हणजेच दारापासून दूर उभे राहा आणि हात लावू नका. याशिवाय चालत्या मेट्रोमध्ये दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही करू नका. आता ही एक उघड गोष्ट आहे आणि प्रत्येकाला त्याबद्दल माहिती आहे परंतु काही लोकांना बळजबरीनं धोक्याचा सामना करणं आवडतं. मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनंही असंच केलं आणि जबरदस्तीनं दरवाजा उघडण्यास सुरुवात केली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती जबरदस्तीने मेट्रोचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. मेट्रो सुरु असतानाही तो असं कृत्य करत आहे. . खूप प्रयत्न केल्यानंतर दरवाजा उघडतो आणि ती व्यक्ती जबरदस्तीनं त्या मेट्रोतून उडी मारायला लागते. चालत्या वाहनातून उडी मारल्यानं काय परिणाम होतात हे आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या व्हिडिओमध्येही तेच घडलं. ती व्यक्ती बाहेर उडी मारते आणि धापकन जमिनीवर पडते. त्याला पाहून त्याला गंभीर दुखापत झाली असेल हे दिसून येतंय.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, @HowThingsWork_ या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत असलेल्या पहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात