जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आम्हाला फेमस व्हायचंय, सिगारेट वाल्या बाबाकडे पैसे देऊन प्रेमीयुगुलांची मागणी, नेमका काय आहे हा प्रकार VIDEO

आम्हाला फेमस व्हायचंय, सिगारेट वाल्या बाबाकडे पैसे देऊन प्रेमीयुगुलांची मागणी, नेमका काय आहे हा प्रकार VIDEO

सिगारेट वाले बाबा

सिगारेट वाले बाबा

अशी अनेक जोडपे मी पाहिले आहेत, जे आधी प्रेमीयुगुल बनून यायचे आणि नंतर इथे येऊन गेल्यावर सहा महिन्यांनी पती पत्नी होऊन पुन्हा याठिकाणी धन्यवाद म्हणायला आले, असेही त्यांनी सांगितले.

  • -MIN READ Local18 Lucknow,Uttar Pradesh
  • Last Updated :

अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 27 जुलै : गेल्या महिन्यात संपूर्ण देशभरात एसडीएम ज्योति मौर्य, मनीष दुबे, सचिन-सीमा हैदर आणि आता पाकिस्तानात गेलेल्या अंजू-नसरुल्लाह यांच्या लव्ह स्टोरी सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या प्रेमकहाण्या पाहून लखनऊमधील आता प्रसिद्ध कप्तान साहब दर्गा इथे प्रचंड गर्दी होत आहे. विवाहित लोकांसह प्रेमीयुगुल इथे धाव घेत आहेत. या दर्गावर अशी मान्यता आहे की, इथे फक्त एक सिगारेट अर्पण केल्याने जोडी बनते. तसेच ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांचे लग्नही अमर होऊन जाते. इतकेच नव्हे तर काही जण याठिकाणी असे आहेत, जे सेवक मिश्रीलाल यांना पैसे देऊन अर्जी लावत आहेत की, त्यांची जोडीसुद्धा सीमा-सचिन, अंजू-नसरुल्लाह आणि ज्योति मौर्य-मनीष दुबे सारखी चर्चेत यावी. तुम्हाला ऐकून जरा विचित्र वाटत असेल, पण हे खरं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

येथील सेवक मिश्रीलाल यांनी सांगितले की, कप्तान साहेब यांना सिगारेट वाले बाबा म्हणतात, कारण हे बाबा लोकांच्या जोड्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जर कुणा प्रेमीयुगुलाचे लग्न होत नसेल किंवा नातेवाईक परवानगी देत नसतील तर इथे येऊन माथा टेकल्यावर त्यांची समस्या सुटते. अनेक जण याठिकाणी येतात, पैसे देतात आणि सांगतात की, त्यांची जोडीही देशात प्रसिद्ध व्हावी, असेही त्यांनी सांगितले. सिगारेट, दारू आणि मांसाहार चढवला जातो

सेवक मिश्रीलाल यांनी सांगितले की, सिगारेट वाल्या बाबाला जर इथे येऊन प्रेमी जोडप्याने सिगारेट किंवा दारू किंवा मांस जरी चढवले तर ते प्रसन्न होता. अशी अनेक जोडपे मी पाहिले आहेत, जे आधी प्रेमीयुगुल बनून यायचे आणि नंतर इथे येऊन गेल्यावर सहा महिन्यांनी पती पत्नी होऊन पुन्हा याठिकाणी धन्यवाद म्हणायला आले, असेही त्यांनी सांगितले. सिगारेट वाले बाबा कोण आहेत - इतिहासकार डॉ. रवि भट्ट यांनी सांगितले की, कॅप्टन फ्रेड्रिक वेल्स हे फ्रेड्रिक वेल्स ब्रिटिश सेनेत कॅप्टन होते. 21 मार्च 1858 रोजी मुसा बाग येथे इंग्रज आणि अवधच्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये युद्ध झाले. त्यात ब्रिटिश सैनिकांनी विजय मिळवला. मात्र, त्यात कॅप्टन वेल्स यांचा मृत्यू झाला. यानंतर इथे त्यांची समाधी बनवण्यात आली. यावर एक दगडही आहे, ज्यावर कॅप्टन यांचे नाव आणि त्यांच्या मृत्यूची तारीख लिहिलेली आहे. ब्रिटीश आर्मीच्या कॅप्टनच्या या समाधीसमोर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक आपली इच्छा व्यक्त करतात. कॅप्टन वेल्सला सिगारेटची खूप आवड होती. त्यामुळेच याठिकाणी सिगारेट चढवली जाते. इथे येण्यासाठी तुम्हाला लखनऊच्या बालांगच चौकातून हरिनगर चौक येथे यावे लागेल. यानंतर तुम्हाला मूसा बाग पॅलेस पोहोचल्यावर दोन रस्ते दिसतील. एक रस्ता हा मूसा बाग पॅलेसच्या आतून जातो तर दूसरा रस्ता हा एका दर्गेच्या मागून जातो. याठिकाणी ही दर्गा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात