मुंबई, 15 मार्च : कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं भारतातून कोरोना जावा यासाठी लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत. दर संसर्ग वाढू नये म्हणून लोककला, मेसेज, व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. देशभरात शंभरहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसला पळवून लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले जात आहे. या व्हिडीओमध्ये गायक नरेंद्र चंचल कोरोनावर भजन गात आहेत. त्यांच्या या भजनाचा व्हिडीओ सोशल माडियावर तुफान व्हायरल होत आहे. ते भजन गाताना त्यांच्या मागून श्रोतेही भजन गात असल्याचं ऐकायला मिळत आहे.
ह्या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखहून अधिकवेळा लोकांनी पाहिलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर तुफान कमेंट्स केल्या आहेत. 13 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. देशात कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.