जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे बाप! किचनमध्ये लपून बसला होता खतरनाक कोब्रा साप, हात लागला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

बापरे बाप! किचनमध्ये लपून बसला होता खतरनाक कोब्रा साप, हात लागला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

बापरे बाप! किचनमध्ये लपून बसला होता खतरनाक कोब्रा साप, हात लागला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

किचनमध्ये लपून बसलेला साप अचानक समोर आला आणि सर्वांना घाम फुटला.

  • -MIN READ Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

भुवनेश्वर, 07 ऑगस्ट : किचनमध्ये झुरळ, कोळी, पाल, उंदीर अशा प्राण्यांना तुम्ही पाहिलं असेल. कित्येकांना याच प्राण्यांची भीती वाटते. विचार करा यांच्या जागी खतरनाक साप असेल तर… फक्त कल्पनेनेच घाम फुटला ना. असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका घरात एक भलामोठा साप घुसला आणि तो किचनमध्ये लपून बसला. थरकाप उडवणारा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका घरात किचनमध्ये एक कोब्रा साप लपून बसला. त्यानंतर त्याला पकडण्याची धडपड सुरू झाली आहे. सापाला पकडण्याचा हा संपूर्ण प्रयत्न कॅमेर्‍यात कैद करण्यात आला. साप किचनमध्ये असल्याचं समजताच सर्वांना घाम फुटला. घरातल्यांनी सर्पमित्राला त्या सापाला पकडायला बोलावलं. व्हिडीओत तुम्ही पाहाल किचनच्या एका कोपर्‍यात साप वेटोळे घालून बसला आहे. सर्पमित्र त्याला एका काठीने काढण्याचा प्रयत्न करतो तसा तो साप फणा काढून उभा राहतो. साप खूप रागात दिसतो आहे. तो सर्पमित्रावर हल्लाही करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हे वाचा -  बापरे! श्वानाला वाचवण्यासाठी मुलांनी अजगराच्या विळख्यात टाकले आपले चिमुकले हात; काय झाला शेवट पाहा VIDEO त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून साप किचनच्या त्या कोपऱ्यातून बाहेर पडतो आणि भांड्यां मध्ये जाऊन लपतो. तिथून तो सिलिंडर मागून धावत येत पुन्हा किचनच्या दुसर्‍या कोपर्‍यात घुसतो. यादरम्यान तो बराच वेळा सर्पमित्राला दंश करायला जातो. सर्पमित्र ही घाबरत नाही की हार मानून मागे हटत नाही. अखेर तो सापाला पकडण्यात यशस्वी होतोच.

 व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. साप किती मोठा आहे. यू ट्यूब चॅनेल वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात दिलेल्या माहितीनुसार हा मोनोकल्ड कोब्रा आहे. ज्याला चंद्र नाग म्हणूनही ओळखलं जातं. बर्‍याच वर्षांनी हा साप दिसला असं ही या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. हे वाचा -  VIDEO - खाताच बेडकांना बसला ‘440 व्होल्टचा झटका’; कोण आहे हा किडा तुम्ही सांगू शकता का?

दरम्यान किचनमध्ये साप सापडण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. पश्चिम बंगालमधील (West Bengal) अलीपुरद्वार जिल्ह्यातील एका घरात तर किचनमध्ये तब्बल 17 विषारी साप होते. ही घटना अलीपुरद्वार जिल्ह्यातील कुमारग्राम ब्लॉकच्या खोवादंगा गावातील आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात