ताइपे, 04 सप्टेंबर : भारत-चीन सीमेवरील तणावानंतर आता चीनला आणखीन एक मोठा दणका मिळाला आहे. चीनचं सुखोई-35 लढाऊ विमान तैवाननं पाडल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून दोन्ही देशांकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र सुखोई-35 विमान पडल्यानं विमानानं पेट घेतला आहे.
विमान पाडल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती तैवानकडून देण्यात आली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. वैमानिक सुरक्षित असल्याचंही सांगितलं जात आहे. तैवानच्या सीमेवर सुखोई-35 लढाऊ विमान घुसखोरी कऱण्याच्या प्रयत्नात असताना ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
तैवानने इशारा देऊनही चीनने मुजोरी केली आणि सीमेपलिकडे विमान आल्यानं तैवाननं कारवाई केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. या घटनेत वैमानिक बचावला असून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या वृत्ताला दोन्ही देशांकडून दुजोरा मिळाला तर कदाचित मोठा तणाव पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे.
चीन गेल्या काही दिवसांपासून तैवानच्या सीमाभागात आपली लढाऊ विमानं पाठवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. वारंवार तैवानकडून इशारा देऊनही चीन ऐकत नसल्यानं सुखोई-35 लढाऊ विमान पाडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र दोन्ही देशांनी अद्यापही या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.