मुंबई, 22 जुलै : रस्त्यावरील विक्रेत्यांची किंवा फेरीवाल्यांची एक हटके स्टाइल असते. आपल्याजवळील सामान विकण्यासाठी एका विशिष्ट आवाजात, लईत किंवा युनिक पद्धतीने ते लोक ओरडतात जेणेकरून सर्वांचं लक्ष आपल्याकडे जाईल. अशाच युनिक पद्धतीने विक्री करणारा कच्चा बादामवाला याआधी सोशल मीडियावर फेमस झाला. आता अशाच आणखी एका विक्रेत्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, जो चणे विकतो. या चणेवाल्याची खासियत म्हणजे तो फाडफाड इंग्रजी बोलता आणि त्याची स्टाइल खूपच हटके आहे. छत्तीसगढमधील देवलखन गुप्ता. बलरामपूर जिल्ह्यातील राजपूर बस स्टॅंडजवळ चणे विकतो. जवळपास 30 वर्षांपासून तो चणे विक्री करतो. पण चणे घ्या चणेSSSSS, चणेवालाSSSSS, चना लो चनाSSSSS, असं तो ओरडत नाही किंवा कच्चा बादामवाल्यासारखा गातही नाही. तर इंग्रजी बोलून तो चणे विकतो. आश्चर्य म्हणजे देवलखन फक्त दहावी पास आहे, तेसुद्धा हिंदी मीडियममधून. इंग्रजी भाषेतून शिक्षण न घेता इतका कमी शिकलेला असतानाही तो फाडफाड इंग्रजी बोलतो. हे वाचा - काय म्हणावं आता! पोलिसानेच लहान मुलासारखा पसरलं भोकाड; साधं ब्लड टेस्टसाठी सॅम्पल देताना हवा टाइट देवलखनने सांगितल्यानुसार सुरुवातीला तो तोडकंमोडकं इंग्रजी बोलत होता. पण हळूहळू तो फ्लूएंट इंग्रजी बोलू लागला. याचं श्रेय तो आपल्या मित्रांना देतो. त्याचं मोडकंतोडकं इंग्रजी पाहून त्यांनी त्याला मदत केली आणि आता तो जबरदस्त इंग्रजी बोलू लागला. जर कुणी काही शिकायचं ठरवलं आणि जिद्द, मेहनतीने ते शिकलं तर नक्कीच यश मिळतं, हे देवलखनने सिद्ध केल्याचं त्याचे मित्र सांगतात.
त्याने आपल्या रस्त्यावरील दुकानात एक माइक आणि लाऊडस्पीकर लावला आहे. ज्यावर इंग्रजीत बोलून तो ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतो. तो फक्त चणे घेण्यासाठी ग्राहकांना बोलवत नाही तर त्यात तो आपल्या चण्याची क्वालिटी आणि ते खाण्याचे फायदेही सांगतो. हे वाचा - VIDEO : ‘काय तो पाऊस, काय ते खड्डे, केडीएमसी ओकेमध्ये’, कल्याणच्या तरुणाचा Video Viral त्याच्या या अनोख्या स्टाइलमुळे ग्राहकही त्याच्याकडून चणे घेतात. यामुळे त्याचं उत्पन्नही वाढलं आहे. हेच त्याच्या उपजीविकेचं मुख्य साधन बनलं आहे. तसंच यामुळे त्याला आपली एक वेगळी ओळखही मिळाली आहे.

)







