अनेक वेळा असं होतं महिला पतीबाबत समाधानी नसतात. याबाबत पतीला माहिती नसतं. पण असे काही संकेत ज्यामुळे तुमची बायको तुमच्यावर समाधानी नाही, हे दाखवतात. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये याची माहिती दिली आहे.
महिलांच्या मनात काय चाललं आहे ते अनेकदा समजत नाही. पण तिच्या तुमच्यासोबतच्या वागण्यात असे काही बदल दिसले तर ती तुमच्याबाबत संतुष्ट नाही हे समजून जा.
कमी बोलणं - जेव्हा बायको खूप आनंदी असते तेव्हा ती आपल्या पतीशी खूप बोलत असते. तुमचीही अशी बोलकी बायको अचानक शांत शांत राहू लागली, कमी बोलू लागली, तर समजा की ती असमाधानी आहे. म्हणजे तिला तुमच्याबद्दल काहीतरी राग येतोय. त्याबाबत तिच्याशी बोला.
प्रत्येक गोष्टीवर राग - तुमची पत्नी तुमच्या नाराज होऊ लागली, भांडू लागली. तर समजून जा, ती समाधानी नाही. तिचा राग दूर करण्याचा प्रयत्न करा.
फक्त स्वतःचा विचार - महिला सामान्यपणे स्वतःऐवजी आपल्या प्रिय व्यक्तींचा विचार करतात. असं असताना तुमची पत्नी अचानक तुमच्यापासून दूर राहिली, तुमची काळजी घेत नसेल, ती फक्त स्वतःचा विचार करते, असं तुम्हाला वाटत असेल तर ती असमाधानी आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)