जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चित्रात लपलेली तलवार शोधा; 17 सेकंदांत शोधणारा असेल बुद्धिमान

चित्रात लपलेली तलवार शोधा; 17 सेकंदांत शोधणारा असेल बुद्धिमान

चित्रात लपलेली तलवार शोधा; 17 सेकंदांत शोधणारा असेल बुद्धिमान

चित्रात लपलेली तलवार शोधा; 17 सेकंदांत शोधणारा असेल बुद्धिमान

सध्या सोशल मीडियावर मेजर ड्रॅपकिन अँड ओ नावाच्या कंपनीनं तयार केलेलं दृष्टिभ्रमाचं एक चित्र व्हायरल होतंय. या चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत. त्या दोघांच्या मध्ये लपलेली तलवार शोधायची आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच दृष्टिभ्रम निर्माण करणारी चित्रं किंवा फोटो डोकं खाजवायला लावतात. डोळ्यांना चटकन दिसणार नाही, अशा पद्धतीचे हे फोटो असतात किंवा चित्रं तयार केलेली असतात. मेंदूच्या साह्यानं तर्क लावून शोधण्याचा प्रयत्न केला, तरच त्यात लपलेल्या गोष्टी शोधता येतात. बुद्धीला चालना देण्यासाठी अशी दृष्टिभ्रमाची चित्रं खूप महत्त्वाची ठरतात. सोशल मीडियावर दृष्टिभ्रमाचे अनेक फोटोज किंवा चित्रं व्हायरल होतात. अनेकजण ती रहस्यं उलगडायचा प्रयत्न करतात; मात्र फारच थोड्या जणांना या रहस्यांची उकल करता येते. सध्या सोशल मीडियावर मेजर ड्रॅपकिन अँड ओ नावाच्या कंपनीनं तयार केलेलं दृष्टिभ्रमाचं एक चित्र व्हायरल होतंय. या चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत. त्या दोघांच्या मध्ये लपलेली तलवार शोधायची आहे. यासाठी 17 सेकंदं वेळ आहे. आतापर्यंत यात 99 टक्के जण अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे हे आव्हान खूप कठीण आहे, हे यावरून दिसून येतं. हेही वाचा -  Viral Video : आधी गाईला लाथ मारली मग शेपूट खेचली… त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं हे एक स्केच आहे. त्यात दोन व्यक्ती जहाजावर हॅट घालून उभ्या आहेत. त्या दोन्ही व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ते काही शोधत आहेत किंवा चिंतेत आहेत, असं दिसतंय. एक व्यक्ती समोर तोंड करून उभी आहे, तर दुसरी व्यक्ती पाठमोरी आहे. वाचकांना ते शोधत असलेली वस्तू शोधायला मदत करायची आहे. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीची तलवार हरवली आहे. तीच ते शोधत आहेत. पाठमोऱ्या व्यक्तीची तलवार त्याच्या कमरेला लावलेली दिसते आहे.

    News18

    या चित्रातली तलवार शोधण्यासाठी 17 सेकंदाचा वेळ आहे. केवळ डोळ्यांना दिसतंय, ते पाहून शोधण्यापेक्षा बुद्धीचा वापर करा. त्यामुळे तलवार शोधणं सोपं होईल. नाहीच सापडली, तर समोरच्या व्यक्तीला नीट न्याहाळा. त्याच्या शरीरावरच कुठे तरी तलवार असलेली दिसेल. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या पायावर तलवार आहे. त्याच्या पॅन्टवर खालच्या बाजूने आहे. चित्र उलटं करून पाहिलं तर तलवार स्पष्ट दिसू शकेल.

    News18

    या चित्रातली तलवार शोधण्यासाठी डोळ्यांपेक्षा बुद्धीचा वापर करून 17 सेकंदांत ती तलवार शोधणारी व्यक्ती बुद्धिमान असेल. दृष्टिभ्रम म्हणजे एखाच्या वस्तूची, गोष्टीची डोळ्यांना फसवणारी प्रतिमा. दृष्टिभ्रमाचा उपयोग मानसशास्त्रातही केला जातो. मानवी स्वभावाचे, मानवी बुद्धीचे कंगोरे शोधण्यासाठी ही चित्रं मदत करतात. प्रत्येक चित्राकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोन असतात. त्यानुसार त्या त्या व्यक्तीचं स्वभाववैशिष्ट्य कळू शकतं. त्यामुळेच मानसोपचार तज्ज्ञांकडून दृष्टिभ्रमाच्या चित्रांचा वापर उपचारपद्धती म्हणून केला जातो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात