राजकुमार सिंह, प्रतिनिधी वैशाली, 29 जून : लोभ ही वाईट प्रवृत्ती आहे, असे म्हटले जाते. मात्र, असे असूनही, काही जण लोभात अडकतात आणि स्वतःचे नुकसान करतात. मांजरीच्या लोभाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दूध पीत असताना मांजरीचे डोके भांड्यात घुसले. हे भांडे तिच्या डोक्यात सुमारे तासभर अडकून राहिला. बिहारच्या वैशालीतील लालगंजमधील अगरपूर येथे घडली. एका घरात दूध पिण्यासाठी मांजर घुसली. मात्र, तिच्यासोबत एक वेगळीच घटना या घरात घडली.
घरात जाताच मांजरीची नजर एका भांड्यावर पडली. दूध मिळण्याची शक्यता पाहून मांजरीने आपले डोके भांड्यात अडकवले. पण मांजरीचे डोके भांड्यात अडकले. यानंतर ही मांजर घरात इकडे तिकडे धावू लागली. यामुळे घरातील अनेक वस्तूंचेही नुकसान झाले. यानंतर घरातील लोकांनी मांजरीच्या अंगावर बांबू टाकला. मग मांजराचे डोके भांड्यातून बाहेर आले. या प्रकारामुळे मांजरीच्या तोंडाला दुखापत झाली. सध्या मांजरीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.