नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : जगात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. यामध्ये काहींचा स्वभाव सभ्य असतो तर काहीजण वाईट वागणुकीमुळे आदर गमावतात. बऱ्याच वेळा लोक आपल्यापेक्षा कमी असलेल्या लोकांशी गैरवर्तन करताना दिसून येतात. याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक गैरवर्तनाचा व्हिडीओ समोर आला असून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर एक महिला महागड्या कारमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहे. ती आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असल्याचे दिसत आहे. पेट्रोल भरल्यानंतर तिने नोझल काढून पंपाच्या मशिनवर लावले. त्यानंतर महिला कार चालकाकडे पैसै घेण्यासाठी जाते आणि तो पैसे तिच्या हातात न देता तिच्या अंगावर फेकतो. सगळे पैसै खाली पडतात आणि महिला कर्मचारी ते पैसै उचलताना दिसत आहे. हे सगळं करुन कार चालक तिथून निघून जातो.
That mercedes driver is an a$hole! She didn't deserve this God bless her! ❤️ pic.twitter.com/aNWpU69iLC
— The Figen (@TheFigen_) February 4, 2023
पैसे घेतल्यानंतर ती महिला उभी राहते आणि तिच्यावर झालेल्या अशा वाईट वागणुकीमुळे निराश वाटत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी कार चालकावर संताप व्यक्त करत आहेत. @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकांउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर गैरवर्तन करतानाचा हा पहिलाच व्हिडीओ नाहीये. या पहिलेही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media troll, Video viral, Viral news