मुंबई 10 जानेवारी : इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाची अनेक चित्रं किंवा फोटोज व्हायरल होतात. ही ऑप्टिकल इल्युजनची चित्रं मेंदूला चालना देतात. निरीक्षणशक्ती वाढवतात व पाहणाऱ्याचं व्यक्तिमत्त्वही उलगडतात. चित्र किंवा फोटो पाहणारा नेमकं काय पाहतो आहे, त्यावरून बऱ्याच गोष्टी समजतात. ही कोडी खूप रंजकदेखील असतात. त्यामुळे त्यांना लोकप्रियताही मिळते. सध्या व्हायरल होणारा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो एका घनदाट जंगलाचा आहे. त्यात लपलेला एक पक्षी वाचकांना शोधायचा आहे. 5 सेकंदांमध्ये हे कोडं सोडवायचं आव्हान वाचकांपुढे आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या या कोड्यात जंगलाचा एक फोटो दिसतोय. दोन मोठे झाड आहे आणि त्यांच्या आजूबाजूला छोटी छोटी घनदाट झाडं दिसत आहेत. झाडांमधून थोडंसंच आकाश पाहायला मिळतंय. थोडीशी सूर्यकिरणंही खाली डोकावत आहेत. हिरव्या रंगाच्या अनेक छटा यामध्ये दिसतायत. त्यातच एक पक्षी लपलाय. तीक्ष्ण नजर असलेल्यांना हा पक्षी शोधणं फारसं कठीण नाही; मात्र इतरांसाठी ते अवघड आव्हान आहे. ज्यांना यात लपलेला पक्षी शोधता येत नसेल, त्यांनी संपूर्ण चित्राचं नीट निरीक्षण करावं. तरीही नाही सापडलं, तर फोटोच्या मधल्या वरच्या भागात काही दिसतंय का ते पाहावं. झाडांच्या मधून दिसणाऱ्या आकाशाप्रमाणे निळ्या रंगाचा पक्षी तिथं दिसेल. वरवर पाहता ते आकाशच वाटतं; मात्र नीट पाहिलं तर तो एक पक्षी असल्याचं लक्षात येतं. फोटोच्या मधोमध असलेल्या मोठ्या झाडावरच हा पक्षी बसलाय. या कोड्याचं उत्तर 5 सेकंदांमध्ये शोधणाऱ्यांची बुद्धिमत्ता खरोखरच उत्कृष्ट असेल. ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांचा उपयोग निरीक्षणशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही त्याचा उपयोग होतो. एका चित्रात दिसणाऱ्या किती गोष्टींचं निरीक्षण केलं जातं, कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात, यांचा अभ्यास करून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तपासलं जातं. मानसोपचार थेरपीमध्येही याचा वापर केला जातो. रुग्णाचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी याची मदत घेतली जाते. ऑप्टिकल इल्युजनची काही कोडी फोटोंच्या माध्यमातून तयार केलेली असतात, तर काही वेगवेगळी नक्षी, आकार, रंगसंगती यांचा वापर करून तयार केलेली असतात. यात डोळ्यांना वरवर दिसणारं चित्र आणि प्रत्यक्ष यात फरक असू शकतो. हीच या चित्रांची गंमत असते. अशी जास्तीत जास्त कोडी सोडवल्यामुळे बुद्धी तल्लख होते. तसंच मनोरंजनही भरपूर होतं. त्यामुळेच ऑप्टिकल इल्युजनचे फोटो भरपूर व्हायरल होतात.
ही कोडी बुद्धिमत्ता चाचणीसाठीचं एक माध्यम म्हणून चांगली असली, तरी केवळ याच आधारावर बुद्धिमत्तेची चाचणी घेणं योग्य नसतं. त्यासाठी इतरही काही बुद्धिमत्ता चाचण्या उपलब्ध असतात.