मुंबई 28 नोव्हेंबर : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम करणारे फोटोज आणि चित्रं व्हायरल होताना दिसतात. असे हे फोटोज किंवा चित्रं बुद्धीसाठी खुराक ठरतात. अशी किती तरी कोडी व्हायरल होतात, ज्यामुळे युझर्सना आपल्या मेंदूला चांगलाचा ताण द्यावा लागतो. या वेळीही एक चित्र चांगलंच व्हायरल झालं आहे. यात अनेक मिनियन्स गोळा झालेले दिसताहेत. या मिनियन्सच्या गर्दीतून तीन केळी शोधून काढायची आहेत.
ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाच्या खेळाची चित्रं तयार करणारे आर्टिस्ट हे चित्रं अशा प्रकारे डिझाइन करतात, जेणेकरून नेटिझन्सचा चांगलाच गोंधळ उडेल. अशा परिस्थितीत नेटिझन्सना यात लपलेली वस्तू शोधून काढायची असते. अर्थात, फार कमी जणांनाच वस्तू शोधण्यात यश येतं.
अशा या मिनियन्सची गर्दी असलेल्या चित्रात तीन केळी लपवलेली आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदांचा अवधी आहे. यामुळे तुमची नजर तीक्ष्ण असेल, तरच तुम्ही हे आव्हान सहज पेलू शकाल.
मिनियन्सच्या गर्दीत कुठे आहेत केळी?
ऑप्टिकल इल्युजनचं जे चित्र सध्या व्हायरल झालंय, ते हंगेरीचा आर्टिस्ट गेर्जली डुडासने काढलं आहे. या आर्टिस्टची चित्रं कायमच संभ्रमात टाकतात. यामुळे नेटिझन्ससाठी वस्तू शोधणं अवघड बनतं.
या मिनियन्सच्या गर्दीत 3 केळी लपलेली आहेत. तुमची नजर घारीसारखी असेल तर तुम्ही ती केळी 10 सेकंदांत शोधून दाखवा. असं झाल्यास तुमची निरीक्षणशक्ती खरंच कौतुकास्पद आहे यात शंका नाही.
हे घ्या कोड्याचं उत्तर
तुमची नजर खूप तीक्ष्ण असेल तर तुम्ही नक्कीच या चित्रातून केळी शोधून काढाल. परंतु, तुम्ही अजूनही चित्रातून केळी शोधण्यात मग्न असाल, तर मात्र तुम्ही हे चित्र नीट बारकाईने पाहायला हवं. कारण, या आर्टिस्टने हे चित्र असं काही फसवं किंवा संभ्रम निर्माण करणारं केलं आहे की ज्या ठिकाणी केळी आहेत, तिथे तुमची नजर जाणंही अशक्य आहे.
तरीही, तुम्हाला केळी सापडली नसतील, तर आम्ही दिलेलं हे चित्र नीट पाहा. यात 3 केळी मिनियन्सच्या गर्दीत कुठे लपली आहेत हे लाल रंगाच्या हायलायटरने दाखवलं आहे.
दृष्टिभ्रमाचे हे खेळ लोकांचं उत्तम मनोरंजन करतात. अनेक जण वेळात वेळ काढून ही चित्रं, फोटो, कोडी सोडवतात. तसंच लोकांचा मिळणारा प्रतिसाद या खेळाची लोकप्रियता भरपूर आहे हेच दर्शवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Game, Social media, Viral, Viral photo