नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : ऑटो, टॅक्सी किंवा कॅबमधून प्रवास करताना काही ड्रायव्हरला आपण आपल्याला कुठे जायचं आहे ते ठिकाण सांगतोच. पण काही प्रवासी किंवा ड्रायव्हर असे असतात ज्यांना गप्पा मारायलाही आवडतं. मग कोणत्या विषयांवरून त्यांच्यात गप्पा रंगतील सांगू शकत नाही. अशाच एका कॅब ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या गप्पांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ड्रायव्हर आणि प्रवाशी असं काही बोलताना दिसले की त्यांच्या गप्पा ऐकून नेटिझन्स थक्क झाले आहे. असा या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला हे ऐकण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल. तर हा व्हिडीओ नीट ऐका. ड्रायव्हर-प्रवाशातील संवाद ऐकून तुम्हीही हैराण व्हाल, तोंडात बोटं घालाल. व्हिडीओ पाहिला तर यात ड्रायव्हर दिसतो आहे. पण मागच्या सीटवर बसलेला प्रवासी दिसत नाही आहे. जो ड्रायव्हरचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात शूट करत करत त्याच्याशी बोलतो आहे. पण तुम्ही नीट ऐकलं तर त्याची भाषा मात्र वेगळी आहे. ना तो हिंदीत बोलत आहे, ना इंग्रजीत, ना कोणत्या स्थानिक बोली भाषेत. तर तो प्रवासी संस्कृतमध्ये बोलतो आहे. हे वाचा - 2 राज्यांचे पोलीस शोधत आहेत चोरीला गेलेली चप्पल; नेमकं प्रकरण तरी काय? संस्कृत भाषा येत असलेल्यांना प्रवाशी नेमकं काय बोलतो आहे ते समजलं असेल. पण ज्यांना नाही येत त्यांच्या सर्वकाही डोक्यावरून गेलं असेल. त्यामुळे आपल्याला काही समजलं नाही तर या साध्या ड्रायव्हरला काय समजेल असं कित्येकांना वाटलं असेल. पण पुढे जे घडतं ते थक्क करणारं आहे. ड्रायव्हरही प्रवाशाच्या संस्कृत भाषेतील प्रश्नांची संस्कृत भाषेतच उत्तर देतो. अगदी फाडफाड संस्कृत बोलतो. तेव्हा मात्र सर्वजण हैराण होतात. या कॅबमध्ये बसलेला प्रवासीही ड्रायव्हरचं संस्कृत ज्ञान पाहून इतका प्रभावित झाला की त्यानेच हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. @chidsamskritam ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. हे वाचा - ओ तेरी! हातातील ग्लास काही क्षणात गायब; ‘जादूगार’ शिक्षकाचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल भारतात बऱ्याच शाळांमध्ये संस्कृत शिकवलं जातं. पाठ्यपुस्तक सोडता दैनंदिन जीवनशैलीत मात्र इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक भाषेप्रमाणे कुणी संस्कृत बोलताना दिसत नाही.
Amazing !!
— LAKSHMI NARAYANA B.S (BHUVANAKOTE) (@chidsamskritam) November 10, 2022
This car driver in Delhi speaks Sanskrit with me this morning!! pic.twitter.com/z6XU8B9glk
त्यामुळे तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि तुम्हाला संस्कृत येत असेल तर या ड्रायव्हर आणि प्रवाशात नेमका काय संवाद झाला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.