नवी दिल्ली 05 जानेवारी : भांडण केल्याने कोणाचं भलं होत नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी भांडण सुरू झाल्यानंतर ते सोडवण्यासाठी काही जण पुढे येतात; पण असं भांडण सोडवताना भांडण नेमकं कोणाचं सुरू आहे, हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. अन्यथा अशा भांडणात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाच त्रास होऊ शकतो. भांडण सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीबाबत असाच काहीसा प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार असून, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलंय. कुठे तरी भांडण, मारामारी होत असेल, तर ती सोडवण्याची नैतिक जबाबदारी ते भांडण किंवा मारामारी पाहणाऱ्या लोकांची असते, असं म्हटलं जातं. कारण अनेक वेळा असं घडतं, की छोटं भांडण वेळेत संपवलं नाही, तर ते मोठं रूप धारण करतं व त्यात कधी कधी कोणाचा जीवही जाऊ शकतो. भांडणात मध्यस्थी करण्यापूर्वी ते भांडण नेमकं कोणाचं आहे, ते पाहावं. अन्यथा मध्यस्थी करणाऱ्यांनाही फटका बसू शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून हसू येईल. Viral Video : हे दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, महिलेचा जीव थोडक्यात बचावला ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या युझरने हा मजेदार व्हिडिओ शेअर केलाय. ‘कोण म्हणतो की जगात सभ्यता संपली आहे, आजही काही सभ्य लोक आहेत, ज्यांना भांडण होऊ नये, असं वाटतं,’ अशा अर्थाची कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. अवघ्या 24 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो जणांनी व्हिडिओ लाइक करून, त्यावर विविध मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एका युझरने गमतीत लिहिलं आहे, की ‘इतकी सभ्यता दाखवू नकोस,’ तर दुसर्या युझरने लिहिलं आहे, की ‘शांतिदूत बनायला गेला… हवेत उडाला.’
व्हिडिओमध्ये नेमकं काय? या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एका बाजारात दोन बैलांमध्ये जबरदस्त झुंज सुरू आहे. इतक्यात एक व्यक्ती तिथे येऊन या दोन बैलांचं भांडण सोडवू लागला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका दुकानासमोर दोन बैल एकमेकांना भिडत आहेत. त्यांची झुंज पाहणारे अनेक लोकही तिथे उपस्थित होते; पण या बैलांची झुंज सोडवण्याची कोणी हिंमत केली नाही. तेवढ्यातच तिथे अचानक एक व्यक्ती आली आणि तिने बैलांची झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका बैलानं शिंगाने त्या व्यक्तीला उचलून जमिनीवर आपटलं. त्यानंतर मात्र संबंधित व्यक्ती तिथेच डोक्याला हात लावून बैलांची झुंज पाहत बसली. सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असून असे व्हिडिओ पाहण्यास अनेकांना खूप आवडतं. त्यामुळेच बैलांची झुंज सोडवतानाचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.