नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : आजकाल आपण अनेक गोष्टींचा वापर करुन त्या फेकून देत असतो. मात्र यामध्ये अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा आपण पुनर्वापर करु शकतो. यातील अनेक गोष्टी पर्यावरणात प्रदूषण वाढवतात. पर्यावरणात प्रदूषण करणाऱ्या सर्व घटकांपैकी प्लास्टिक हे सर्वात धोकादायक आहे. प्लास्टिक शेकडो वर्षे वातावरणात राहते आणि कधीही नष्ट होत नाही. प्लॅस्टिक संपवण्याचा कोणताही मार्ग नसला तरी त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो आणि हा देखील सर्वात योग्य पर्याय आहे. ज्याच्या मदतीने माणूस प्लास्टिकचा योग्य वापर करू शकतो. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये प्लास्टिकच्या बाटलीचा योग्य पुनर्वापर करत त्याच्यापासून झाडू बनवला आहे. याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. प्लास्टिकच्या बाटलीच्या झाडूचा व्हायरल व्हिडिओ रिसायकल करताना दाखवला जात आहे. प्लॅस्टिक व्हिडीओच्या रीसायकलमुळे प्लास्टिकला दुसऱ्या आकारात आणले जाते आणि ते पुन्हा वापरता येते.
@fasc1nate या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुणी प्लास्टिकच्या बाटलीचे पातळ तुकडे करताना दिसत आहे. त्याचे तुकडे केल्यावर ती गोळा करते आणि नंतर पुढच्या मशीनमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया करते. धागे बनवल्यानंतर, ते एका बाजूने बंद केले जातात आणि नंतर एका खांबाला लावले जातात. सरतेशेवटी प्लास्टिकच्या बाटलीचे लांब झाडू बनवण्यात येत आहे. ह व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओला 39 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की ही कल्पना चांगली आहे, परंतु झाडू पडल्यामुळे अनेक सूक्ष्म तंतू तुटून बाहेर पडतील, ज्यामुळे नुकसान होईल. हा झाडू भरपूर मायक्रो प्लास्टिक गोळा करेल. एकाने सांगितले की ही कल्पना आश्चर्यकारक आहे आणि जगभरातील लोकांनी याचा वापर करणे सुरू केले तर चांगले होईल. असे अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात.