नवी दिल्ली, 30 मे : सध्या लग्नाचा सीझन चालू असून सर्वत्र लगीन घाई पहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील अनेक वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळत आहे. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भावुक व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. लग्न झाल्यावर नववधू वराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यामध्ये नवरीचा हटके अंदाज पाहून भलेभले चकित झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित तर व्हालच याशिवाय तुम्हाला हसूही अनावर होईल.
लाल रंगाचा पोशाख परिधान केलेली नववधू वराच्या समोर मोठ्या थाटामाटात गुटखा खाताना दिसत आहे. गुटखा चघळणाऱ्या वधूचा हा व्हिडिओ लोकांना पोट धरून हसायला भाग पाडले जात आहे. एकीकडे वर फोनवर बोलत आहे तर दुसरीकडे नवरी गुटख्यावर ताव मारते.
हा
— Nishant Kumar (@Nishantcsi) May 29, 2023
बिमल गुटखा वाली दुल्हन है 😁👇
कम खर्च वाली होगी , एक गुटखा 1 घंटे तक च्वाती होगी , इसलिए होटल में खाना खिलाने का चक्कर ही खत्म 😂😂 pic.twitter.com/4BiDk8e54d
26 मे रोजी राजस्थानच्या बारनमध्ये सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान 2 हजार 222 जोडपी विवाहबंधनात बांधली गेली. जेव्हा हे घडले तेव्हा या पराक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, त्याला खूप पसंती दिली जात आहे. व्हिडीओवर अनेक लाईक्स कमेंट पहायला मिळत आहे.