नवी दिल्ली, 24 जानेवारी : आजकाल मित्र-मैत्रिण हे कुटुंबापेक्षा काही कमी नाही. आपल्या मनातली गोष्ट सांगायला, मजा मस्ती करायला, खास मित्र हे हवेच. अनेक लोक जीवाभावापेक्षा मैत्री जपताना दिसून येतात. सगळ्याच गोष्टी एकत्र शेअर केल्यामुळे अनुभवल्यामुळे त्यांच्यामध्ये खास बॉन्डिंग पहायला मिळतं. अनेकांनी तर मित्रांच्या लग्नात काय करणार, काय घालणार याचीही प्लॅनिंग केली असते. लग्नात मित्र आहेत आणि मजा मस्करी हशा नसणार असं कधीच होणार नाही. असाच काहीसा अनुभव सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून मिळत आहे.
मित्रांनी केलेले विनोद ऐकून लोक हसतात मात्र लग्नाच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिकांच्या घोषणा दिल्याचं कधी ऐकलं आहे का? नसेल तर हा व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की बघा. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे की, नववधू वराची वरमाला घालण्याची विधी सुरु आहे आणि दुसरीकडे नवरदेवाचे मित्र मंडळी जवाहरलाल नेहरु की जय, महात्मा गांधी की जय, सुभाषचंद्र बोस की जय, अशा घोषणा देत आहेत. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर एकच हशा पिकलेला पहायला मिळत आहे.
View this post on Instagram
नवरदेवाच्या मित्र मंडळींनी अशा घोषणा देण्यातृस सुरुवात करताच नववधूच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते. असं दिसतंय की नवरदेवाच्या मित्रांनी दिलेल्या घोषणाबाजीमुळे नववधू आनंदी नाही. तिचे हावभाव काही क्षणातच बदलले. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, Maurya Sumanth Mani नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत व्हिडीओला चार लाखांहून अधिक व्ह्युज पहायला मिळाले आहेत. लग्नांमधील असे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media viral, Top trending, Videos viral, Viral, Viral news