जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बॉयफ्रेंडसोबत झालं ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'; नेमकं काय आहे प्रकरण?

बॉयफ्रेंडसोबत झालं ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'; नेमकं काय आहे प्रकरण?

बॉयफ्रेंडसोबत झालं ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवले 'पार्टनर'

बॉयफ्रेंडसोबत झालं ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवले 'पार्टनर'

कधी, कोणावर, कुठे, कसं प्रेम करावं या ठरवून करायच्या गोष्टी नाहीत त्यामुळे अनेकदा प्रेमात लोकांचं हृदय तुटतं. काही लवकरच यातून बाहेर पडतात तर काहींना जास्त वेळ लागतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जुलै : प्रत्येकाला आयुष्यभरात एकदा तरी कोणावर तरी प्रेम होतंच. काहींना एक नाही तर अनेकवेळाही प्रेम होतं. कधी, कोणावर, कुठे, कसं प्रेम करावं या ठरवून करायच्या गोष्टी नाहीत त्यामुळे अनेकदा प्रेमात लोकांचं हृदय तुटतं. काही लवकरच यातून बाहेर पडतात तर काहींना जास्त वेळ लागतो. हृदय तुटल्यावर, प्रेमात धोका मिळाल्यावर ब्रेकअप झाल्यावर अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. नुकतंच एक तरुणीचं ब्रेकअप झालं होतं आणि ती ब्रेकअपनंतर वडिलांना घेऊन फिरायला गेल्याचं समोर आलं आलं आहे. चर्चेत आलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका मुलीनं तिच्या प्रियकरासह युरोपमधील एका देशात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुर्दैवाने ट्रीपच्या एक आठवड्यापूर्वीच तिचं ब्रेकअप झालं. मग तिनं ती ट्रिप कॅन्सल न करता तिच्या वडिलांना ट्रिप पार्टनर बनवलं.

News18लोकमत
News18लोकमत

एम्मा डी पाल्मा तिच्या बॉयफ्रेंडसोबत युरोप ट्रिपला जाण्यासाठी खूप उत्साहित होती. रिपोर्टमध्ये ती कोणत्या देशाची आहे याचा उल्लेख नाही, पण तिनं तिच्या प्रियकरासोबत पोर्तुगालला जाण्याचा प्लॅन केला होता. ट्रिपला जाण्याच्या एक आठवडा आधी त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्यांची संपूर्ण ट्रिप उध्वस्त झाली. आता तिला प्रवास करता येणार नाही असं वाटलं. पण नंतर तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचे मन राखण्यासाठी तिच्यासोबत पोर्तुगाल ट्रिपला जाण्याचा निर्णय घेतला. याविषयी डेली स्टारने वृत्त दिलं आहे. घर चालवण्याचा 13 वर्षांचा अनुभव, हाऊस वाईफचा CV होतोय व्हायरल एमाने या ट्रिपशी संबंधित एक व्हिडिओ टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या वडिलांसोबत ड्रिंक्स पीत फोटोज देत आहे. तिला वाटले की वडिलांसोबत जाणं हा एक विचित्र अनुभव असू शकतो, परंतु तिनं त्यांच्यासोबत ट्रिपचा खूप आनंद घेतला. दरम्यान, ब्रेकअप, पॅचअपच्या अशा अनेक घटना समोर येत असतात. सोशल मीडियावर तर अशा घटनांचा तुटवडाच नाही. या घटनाही लगेच चर्चेत येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात