नवी दिल्ली, 24 मे : प्रसिद्धी झोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. मात्र काहीतरी वेगळं करणं, धोकादायक स्टंट करणं हे त्यांच्याच अंगलट येतात. स्टंट करताना अनेकवेळा लोकांसोबत भयानक गोष्टी घडल्याचं पहायला मिळालंय. नुकताच आणखी एक स्टंट व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण रॉयल एनफिल्ड बाइकवर स्टंट करताना दिसत आहेत. यादरम्यान दुचाकीस्वाराचा तोल बिघडतो आणि गाडी घेऊन दोघेही जमिनीवर पडतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
royal_.enfield नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत. नको तो स्टंट कशाला करायचा असं लोक बोलत आहेत. ज्या वेगाने त्यांची गाडी कोसळली आहे ते पाहून त्यांना बरंच लागलं असल्याचा अंदाज लावू शकतो.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक कोटी 80 लाख वेळा पाहिले गेला आहे. त्याच वेळी, 8 लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला आले आहेत. यापूर्वीही असे स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एवढंच नाही तर दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच काहीना काही स्टंट करण्याता प्रयत्न करतात.