नवी दिल्ली, 16 जुलै: जगात अनेक धाडसी लोक असतात. जे अनेक धाडसी, अॅडव्हेन्चरस गोष्टी करतात. त्यांचे व्हिडीओ, फोटो इंटरनेटवर नेहमीच समोर येत असतात. एकापेक्षा एक विचित्र, भयानक, धोकादायक स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक स्टंट व्हिडीओ सध्या समोर आलाय. जो पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. बाईक स्टंट गेम सुरु असतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये दोन व्यक्ती धोकादायक बाईक स्टंट करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन व्यक्ती जमिनीवरून बाईक चालवत हवेत उडी मारताना दिसत आहे. त्यानंतर त्याचे शरीर दुचाकीपासून पूर्णपणे दूर होते. हळू हळू ते पुन्हा बाईकवर बसू लागतात आणि परत जमिनीवर येतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल आणि हृदयाचे ठोके वाढतील. हा खतरनाक स्टंट सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे.
व्हिडीओ शूट करणाऱ्यानेही खूप मेहनत घेतली असल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत आहे. @mundo_em_duas_rodas नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळत आहे. दरम्याम, सोशल मीडियावर असे स्टंट व्हिडीओ कायमत पहायला मिळतात. दिवसेंदिवस तरुणाई असे धोकादायक स्टंटकडे आकर्षीत होताना दिसत आहे.