जाहिरात
मराठी बातम्या / Viral / म्हणे, 'लल्ला, रसगुल्ला...', मुलींना वैतागलेल्या मुलांची मुख्याध्यापकांकडे तक्रार; Funny Letter Viral

म्हणे, 'लल्ला, रसगुल्ला...', मुलींना वैतागलेल्या मुलांची मुख्याध्यापकांकडे तक्रार; Funny Letter Viral

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थींविरोधात मुख्याध्यापकांकडे केलेल्या तक्रारीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 10 मे : शाळा म्हटलं की मजामस्ती आलीच. एरवी शाळेत विद्यार्थी विद्यार्थीनींना त्रास देत असल्याच्या तक्रारी असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असं पत्र व्हायरल होत आहेत, ज्यात विद्यार्थ्यांनी विद्यार्थीनी त्यांना त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिलं आहे. ज्यात मुलींना वैतागलेल्या मुलांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आहे (Boy students complaint against girl student). उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातील तैयापूरच्या नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याचं पत्र म्हणून हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार हे पत्र देणारे विद्यार्थी सातवी इयत्तेत शिकणारे आहे. त्यांच्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनी त्यांना त्रास देतात असा आरोप त्यांनी केला आहे.  चुकीच्या नावाने हाक मारून मुली आम्हाला चिडवतात, अशी तक्रार त्यांनी केली आहे. त्यांनी माफी मागावी अशी विनंती या मुलांनी मुख्याध्यापकांकडे केली आहे. हे वाचा -  बहुतेकांना हवाहवासा वाटतोय हा चोर; चोरीचा हा VIDEO चोरट्याचं होतंय कौतुक या पत्रात नमूद केल्यानुसार, महोदय, आम्ही इयत्ता सातवीचे विद्यार्थी आहोत. आम्हाला मुली चुकीच्या शब्दांनी हाक मारतात. जसं की, लल्ला, पागल, औकातीत राहा. आम्हा मुलांचं नाव खराब करतात. डांबर, रसगुल्ला, लल्लासारखं राहा सांगतात. मुली वर्गात आरडाओरडा करतात, गाणी गातात आणि डायलॉगबाजी करतात.

News18

विद्यार्थ्यांनी आपली नावं नमूद केली नाही आहेत.  पण मुलींविरोधात तक्रार करत या पत्राच्या शेवटी त्यांनी काही विद्यार्थीनींची नावंही लिहिली आहेत. या मुलींना शिक्षा देऊन त्यांना आमची माफी मागायला लावावी अशी मागणी केली आहे. हे वाचा -  मोकळ्या वेळेत वर्गात मॉडलिंग करत होत्या विद्यार्थीनी; पाय घसरताच मिळाला मोठा ‘धडा’, Funny Video हे लेटर सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. पत्रात शाळेचं नावही नमूद केलं आहे. पण हे लेटर खरंच त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं आहे, पत्र किती खरं आहे, हे पत्र कोणत्या विद्यार्थ्यांनी आणि का लिहिलं आहे. याबाबत काही माहिती नाही. ज्या शाळेचा यात उल्लेख केला आहे, त्या शाळेमार्फतही काही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात