जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'ड्रीम गर्ल' साठी मुलाचा हटके जुगाड, व्हायरल Photo पाहून लावाल डोक्याला हात

'ड्रीम गर्ल' साठी मुलाचा हटके जुगाड, व्हायरल Photo पाहून लावाल डोक्याला हात

व्हायरल

व्हायरल

आजकालचे तरुण तरुणी त्यांचं बिनधास्त आयुष्य जगत असतात. एखाद्यासोबत ओळख बनवण्यासाठी ते लगेच पुढाकार घेतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जानेवारी : आजकालचे तरुण तरुणी त्यांचं बिनधास्त आयुष्य जगत असतात. एखाद्यासोबत ओळख बनवण्यासाठी ते लगेच पुढाकार घेतात. नवीन जनरेशन नवीन लोकांशी ओळख बनवताना सहसा जास्त संकुचित होताना दिसत नाही. एकमेकांशी ओळख निर्माण करण्यासाठी तरुण तरुणी अनेक हटके आयडीयांचा वापर करताना पहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अलीकडेच Henpecked Hal नावाच्या ट्विटर अकाउंटवरून काही फोटो पोस्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये त्या व्यक्तीने त्याच्या 22 वर्षीय चुलत भावासोबत झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हे वाचून हे दिसून येते की हेनपेक्डच्या चुलत भावाला त्याची ‘ड्रीम गर्ल’ सापडली आहे. त्यावर त्याने त्या मुलीचा नंबर मागितला.

जाहिरात

यादरम्यान जॅकी नावाच्या मुलीने त्याला तिचा नंबर दिला, पण यामध्येही तिने ट्विस्ट आणला. वास्तविक मुलीने तिच्या नंबरमधील काही अंग सांगितले नव्हते. तिचा नंबर मिळवण्यासाठी मुलाने केलेला जुगाड पाहून तुम्हीदेखील डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. याचेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका पेजवर मुलीचा अपूर्ण नंबर दिसत आहे. ज्याच्या खाली सीरियसप्रमाणे नंबर लिहिलेले आहेत आणि ती व्यक्ती प्रत्येक नंबरवर कॉल करून आपल्या ड्रीम गर्लशी बोलण्यासाठी कॉल करतो.

News18लोकमत
News18लोकमत

तरुणाचा हा जुगाड पाहून सगळेच थक्क झाले आणि हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट व्हायरल होताच हेनपेक्डच्या चुलत भावाची ‘ड्रीम गर्ल’ जॅकीने ट्विटरवर हेनपेक्डशी संपर्क साधला आहे आणि त्याच्या चुलत भावाचा नंबर घेऊन त्याच्याशी बोलणं केलं. अशा प्रकारे, प्रेमकथेची सुंदर सुरुवात पाहून युजर्स थक्क झाले आहेत. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात