मराठी बातम्या /बातम्या /Viral /चुकीच्या व्यक्तीसोबत घेतला पंगा; मुलाने चोरांनाच पळवून पळवून मारलं, Video तुफान व्हायरल

चुकीच्या व्यक्तीसोबत घेतला पंगा; मुलाने चोरांनाच पळवून पळवून मारलं, Video तुफान व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आजकाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोर, दरोडेखोरांची हिंमत एवढी वाढली आहे की ते दिवसाढवळ्या देखील चोरी करताना दिसून येतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 28 जानेवारी : आजकाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोर, दरोडेखोरांची हिंमत एवढी वाढली आहे की ते दिवसाढवळ्या देखील चोरी करताना दिसून येतात. त्यामुळे लोकही चोरीच्या भितीने घाबरुन जातात. चालता चालता, ट्रेनमध्ये, बसमध्ये, कुठेही चोरी करण्यासाठी चोर घाबरत नाही. यामधील काही चोर पकडलेही जातात. सीसीटीव्ही फुटेजचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक चोरीच्या घटनांचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच आणखी एक चोरीची घटना समोर आली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

चोरीच्या घटनांमध्ये शक्यतो चोर चोरी करुन पळून जातात. त्याचबरोबर चोरी करताना चोर समोरच्या व्यक्तीला दुखापत करतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही उलटंच घडलेलं पहायला मिळत आहे. एकंदरीत व्हिडीओवरुन चोरांनी चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतल्याचं दिसून येतंय. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक मुलगा आणि मुलगी रस्त्याच्या कडेला चालत असताना अचानक दुचाकीवर दोन चोर त्यांच्यासमोर येतात आणि त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या चोर मुलीच्या हातातून काहीतरी हिसकावले, तर दुचाकीवरील चोराने मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मुलगा धाडसी असल्यामुळे तो अजिबात घाबरला नाही, उलट मुलीला लुटणाऱ्या चोराचा तो सामना करतो आणि नंतर त्या चोरांना बेदम मारहाण करतो. हेल्मेटच्या वरून तो चोराला बेदम मारहाण करतो. यादरम्यान तो गाडीवरच्या चोराला पकडण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो फरार होतो. मुलगा त्याच्या हाती लागलेल्या चोराला पळवून पळून बेदम मारतो.

मुलाने चोरांना चांगलाच चोप दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवरही खूप साऱ्या प्रतिक्रियाही येताना पहायला मिळतायेत. असे अनेक चोरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायेत.

First published:

Tags: Social media viral, Top trending, Viral, Viral news, Viral videos