मुंबई, 15 सप्टेंबर : बिग बॉस 11 (Bigg Boss 11) नंतर चाहत्यांमध्ये आपल्या हॉट अवतारामुळे कायम चर्चेत राहारी अभिनेत्री अर्शी खान (Arshi Khan) सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तर झालं असं की एका खासगी टिव्ही शोमध्ये भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा (Sambit Patra) यांनी तिला PoK चा फुलफॉर्म विचारला. अर्शी खान हिला मात्र हा फूलफॉर्म काही सांगता येईना. ज्या विषयावर ही चर्चा आयोजित केली होती, त्या विषयाची माहिती नसल्याने ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
When u wake up in the morning and see people like Charsi Khan trending......#arshikhan pic.twitter.com/XsgaCDVRmj
— Baba (@bhaveshkjha) September 15, 2020
त्याचं झालं असं की, अर्शी खान हिने (Arshi Khan) एका डिबेट शोदरम्यान कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू असलेल्या तणावात हस्तक्षेप केला, आणि याचा तिला चांगलाच फटका बसला. टीवी डिबेटमध्ये अभिनेत्री अर्शी खानला संबित पात्रा (Sambit Patra) यांनी PoK (पाकिस्तान अधिकृत काश्मीर) चा फुलफॉर्म विचारला, मात्र तिला उत्तर देता आलं नाही. त्यानंतर दोघांमध्ये तू तू में में झाली. या चर्चेत अर्शी खान पीओकेला वारंवार पाकिस्तान म्हणत होती. भाजप नेता संबित पात्रा यांनी यावर आक्षेप घेतला आणि पीओके पाकिस्तान नसल्याचे सांगितले. या डिबेटमध्ये संबित पात्रा यांनी टीव्ही चॅनलवरदेखील निशाणा साधला आणि म्हणाले की तुम्ही इतक्या हुशार लोकांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे, ज्यांना पीओकेचा अर्थही माहित नाही.

)







