मराठी बातम्या /बातम्या /Viral /संतापजनक! गृहमंत्र्यांसाठी तैनात पोलिसांच्या गाडीखाली जिवंत जळला बाईकस्वार; पोलीसच बनवत राहिले VIDEO

संतापजनक! गृहमंत्र्यांसाठी तैनात पोलिसांच्या गाडीखाली जिवंत जळला बाईकस्वार; पोलीसच बनवत राहिले VIDEO

पोलिसांच्या गाडीखाली जिवंत जळाला बाईकस्वार.

पोलिसांच्या गाडीखाली जिवंत जळाला बाईकस्वार.

गृहमंत्र्यांच्या सभेतून परतणाऱ्या पोलिसांच्या गाडीने बाईकला टक्कर दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India

पाटणा, 12 ऑक्टोबर : आपला जीव धोक्यात घालून किंवा आपल्या जीवाची बाजी लावून सामान्य नागरिकांचा जीव वाचवणारे पोलीस. अशा कर्तव्यनिष्ठ पोलिसांचे व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहूनच अशा पोलिसांचा अभिमान वाटतो. पण सध्या पोलिसांचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून संताप व्यक्त केला जातो आहे. गृहमंत्र्यांच्या सभेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या गाडीखालीच एक बाईकस्वार जिवंत जळाला आणि त्याला वाचवण्याऐवजी पोलीसच त्याचा व्हिडीओ बनवत राहिले. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बिहारच्या देवरिया गावाजवळील ही संतापजनक घटना. छपरा-सिवान हायवेवर पोलिसांच्या बसने एका बाईकला धडक दिली. दोन तरुण उडून रस्त्यावर पडले. तर एक तरुण बाईक आणि बससह फरफटत गेला. काही अंतरावर गेल्यानंतर पोलिसांच्या बसच्या फ्युएलचा टँक फुटला आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर बसच्या खाली आग लागली. या आगीत गाडीला अडकलेला बाईकस्वार जळाला.

हे वाचा - बापरे! धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना अचानक तुटली लिफ्ट आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

बसला आग लागताच बसमधील पोलीस आपला जीव वाचवण्यासाठी गाडीतून पटापट बाहेर पडले. त्यांनी गाडीखाली त्या बाईकस्वाराला पेटताना पाहिलं. पण धक्कादायक म्हणजे त्यांनी त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्नच केला नाही. ज्या पोलिसांनी जीव वाचवणं अपेक्षित होतं, तेच पोलीस आपल्या डोळ्यादेखत मृत्यूचा तमाशा पाहत होते. डोळ्यादेखत बाईकस्वार जिवंत जळत असताना, तडफडत असताना पोलीस मात्र त्याला वाचवण्याऐवजी त्याचा व्हिडीओ बनवत राहिले.

" isDesktop="true" id="772794" >

माहितीनुसार या दुर्घटनेत तीन जणांचा बळी गेला आहे. ज्या पोलिसांच्या गाडीखाली तरुणांचा मृत्यू झाला ते पोलीस गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी तैनात होते. सभेतील बंदोबस्ताच्या ड्युटीवर ते परतत होते, तेव्हा हा अपघात झाला.

हे वाचा - हातपंपातून पाण्याऐवजी निघाली दारू! गुन्हेगारांची आयडिया पाहून पोलीसही चक्रावले

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार स्थानिकांनी सांगितलं की बसचा ड्रायव्हर नशेत होता आणि त्यामुळेच गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

First published:

Tags: Bihar, Viral, Viral videos