जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती, धक्कादायक VIDEO

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती, धक्कादायक VIDEO

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती, धक्कादायक VIDEO

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गर्दी इतकी वाढली की काही वेळासाठी चेंगराचेंगरी झाली. काही जणं एकमेकांच्या अंगावर पडले.

  • -MIN READ
  • Last Updated :

उज्जैन, 26 जुलै : गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून कोरोनाच्या महासाथीमुळे देशभरातील मंदिर, शैक्षणिक संस्थांपासून अनेक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक राज्य सरकारकडून योग्य ती पाऊले उचलली जात आहे. दरम्यान उज्जैन येथील महाकाय मंदिरातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आज सोमवारी येथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोरोनानंतर मिळालेली शिथिलता आणि सोमवार असल्याकारणाने मोठ्या संख्येने नागरिक येथे उपस्थित होते. (big Crowd of devotees who came to visit the temple, Stampede like situation shocking VIDEO) देशाला अद्यापही तिसऱ्या लाटेची भीती असताना इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी करणं धोक्याचं असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त केली जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गर्दी इतकी वाढली की काही वेळासाठी चेंगराचेंगरी झाली. काही जणं एकमेकांच्या अंगावर पडले. सुदैवाने वेळेत सुरक्षा रक्षकांनी यावर नियंत्रण आणलं, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. काही वर्षांपूर्वी मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर चेगंराचेंगरीमुळे 23 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मंदिर, स्टेशन आदी ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणणं आवश्यक असतं. तर दुसरीकडे अजूनही देशाला कोरोनाचा धोका असताना कोरोनाच्या सर्व नियमांना तिलांजली दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हे ही वाचा- हा तर Real life बाहुबली, एकीकडे दरी..दुसरीकडे डोंगर; Video पाहून हैराण व्हाल!

  काही काळासाठी येथील गर्दीवर नियंत्रण आणणं अवघड वाटत होतं. मागून गर्दीचा लोट पुढच्यांना ढकलत होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोरोनाच्या नियमांना हरताळ फासल्यामुळे या भागात पुन्हा कोरोना बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात