मराठी बातम्या /बातम्या /Viral /दिवाळीत बिर्याणीचं दुकान उघडलत तर खबरदार...VIDEO मध्ये पाहा काय आहे प्रकरण

दिवाळीत बिर्याणीचं दुकान उघडलत तर खबरदार...VIDEO मध्ये पाहा काय आहे प्रकरण

या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडीओवरुन प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. यात एका व्यक्तीला संत नगर (Sant Nagar) भागात दिवाळीच्या दिवशी बिरयानीचं दुकान उघडण्यावर कथित रुपात एक मुस्लीम दुकानदाराला (Muslim shopkeeper) धमकी दिली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी व्हिडीओची दखल घेत कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओमधील आरोपी स्वत:ला बजरंग दलाचा (Bajrang Dal) सदस्य नरेश कुमार सूर्यवंशी असल्याचं सांगितलं आहे. तो संत नगर स्थित दुकानातील कर्मचाऱ्यांना धमकी देत होता. हे हिंदू क्षेत्र असल्यामुळे दिवाळीत बिरयाणीची विक्री केली जाऊ नये. व्हिडीओमध्ये सूर्यवंशी हा तरुण लोकांना धमकी देत होता. त्याने सणाच्या दिवशी बिरयाणीचं दुकान न उघडण्याचं सांगितलं आहे. (Beware if you open a biryani shop on Diwali Video in Delhi goes viral)

हे ही वाचा-'या' वर्षापासून उघडणार अयोध्येतील राम मंदिर , लवकरच पूर्ण होणार पाया भरणी

पोलिसांनी सांगितलं की, धमकीनंतर दुकान मालकाने दुकान बंद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, व्हिडीओची दखल घेत आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेता कपिल मिश्रा (Kapil Mishra) हरियाणा ( Haryana) मधील गुरुग्रामच्या सेक्टर 12ए मध्ये त्या ठिकाणीवर शुक्रवारी गोवर्धन पूजेत सामील झाले. येथे मुस्लिम समुदायचं लोक प्रत्येक आठवड्यात नमाज अदा करीत होते. पूजेचं आयोजन हिंदू संगठन संयुक्त हिंदू संघर्ष समितिने केलं होतं. गुरुग्राम पोलिसांच्या (Gurugram Police) एका अधिकारीने सांगितलं की, शुक्रवारी त्या ठिकाणी नमाज अदा केलं जात नव्हतं.

First published:

Tags: Bajrang dal, Delhi, Muslim, Shocking viral video