कोलकाता, 11 एप्रिल : साडी नेसून किती तरी महिलांना उठणं, बसणं, चालणंही शक्य होत नाही. पण एका तरुणीने साडी नेसून असं काही करून दाखवलं आहे, जे पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. साडीतही असं काही करणं शक्य आहे का? असाच प्रश्न हा व्हिडीओ पाहून तुम्हाला पडेल. किंबहुना व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही (Stunt in saree). पश्चिम बंगलाच्या रायगंजमध्ये राहणाऱ्या मिली सरकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मिली एक जिमनॅस्ट आणि डान्सर आहे. ती सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास दोन लाख फॉलोअर्स आहेत. मिलीच्या इन्स्टाग्राममध्ये दिलेल्या माहितीनुसार ती एक नॅशनल अवॉर्ड विनिंग डान्सर आहे. योगामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं आहे. नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ शेअर केला आहे तो अद्भुत आहे. हे वाचा - 13,500 फूट उंचावरून तरुणीने मारली उडी; ऐनवेळी पॅराशूटच उघडलं नाही अखेर… व्हिडीओत पाहू शकता मिली गोल्डन बॉर्डर असलेल्या पांढऱ्या साडीत दिसते. ती मोकळ्या जागेत डान्स करते आहे. ‘मुझे नौलखा मंगवा दे रे ओ सैय्या दिवाने’ या गाण्यावर ती डान्स करते. पण सुरुवातीला ती साडी नेसून एक स्टंट करते. ज्यात ती बॅक फ्लिप मारताना दिसते.
जिमनॅस्ट असल्याने ती सहजरित्या बॅकफ्लिप मारते. पण साडी नेसल्यानंतर थोडी काळजी घ्यावी लागते. पण मिली मात्र साडीतही अगदी भारी बॅक फ्लिप मारते. जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यानंतर ती डान्स करते.
तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो स्लो मोशन व्हिडीओ आहे. ज्यात ती साडी नेसून कार्टव्हिल मारताना दिसते. या दोन्ही व्हिडीओवर नेटिझन्सच्या बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - फुल स्पीड पंखा एका हाताने थांबवला, या ‘बाहुबली’चा VIDEO पाहून हैराण व्हाल साडी नेसून स्टंट करणाऱ्या या तरुणीचं कौतुक सर्वांनी केलं आहे. काही युझर्सनी याला जबरदस्त म्हटलं आहे.