जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Swiggy वरून ऑर्डर केली Coffee पण...; Delivery Boy चा प्रताप पाहून ग्राहक शॉक

Swiggy वरून ऑर्डर केली Coffee पण...; Delivery Boy चा प्रताप पाहून ग्राहक शॉक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

स्विगी डिलीव्हरी बॉयने कॉफीची डिलीव्हरी करताना जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 05 मे : सध्या बरेच लोक ऑनलाईन फूड ऑर्डर करतात (Online food delivery). पण कधी डिलीव्हरी उशिरा पोहोचणं, कधी पदार्थात काहीतरी सापडणं, कधी पदार्थ अपेक्षेपेक्षा कमी असणं, अशा बऱ्याच तक्रारी असतात. डिलीव्हरी बॉयजने ग्राहकांपर्यंत पदार्थ पोहोचवण्याआधी ते पार्सल खोलून खाल्ल्याचीही काही प्रकरणं समोर आली आहेत. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सध्या अशा डिलीव्हरी बॉय चर्चेत आला आहे, ज्याने भलताच झोल केला आहे. त्याचा प्रताप पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे (Swiggy delivery boy). ऑनलाईन फू़ड ऑर्डर करणाऱ्या एका ग्राहकाच्या डिलीव्हरी बॉयबाबतची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल  होते आहे. ट्विटरवर या ग्राहकाने चॅटवर केलेल्या तक्रारीचा स्क्रिनशॉट व्हायरल होतो आहे. बंगळुरूतील ही व्यक्ती आहे. या चॅटनुसार, या व्यक्तीने स्विगीच्या माध्यमातून सीसीडीमधून कॉफी ऑर्डर केली होती. स्विगीच्या डिलीव्हरी बॉयने या ग्राहकाने ऑर्डर केलेली कॉफी सीसीडीमधून कलेक्टही केली. पण त्यानंतर त्याने ती ग्राहकाला स्वतः डिलीव्हर केली नाही. तर त्याने चक्क डुंजोमार्फत (Dunzo) ही कॉफी ग्राहकापर्यंत पोहोचवली. हे वाचा -  Yuck! हे काय आहे? एक घास चावताच अंड्यात दिसलं असं काही की…; हादरली महिला डुंजो ही एक डिलीव्हरी कंपनी आहे. जी किराणा, भाज्या, मांस, खाद्यपदार्थ, औषधं, अशा आवश्यक वस्तू  ग्राहकांना डिलीव्हर करते.

जाहिरात

स्विगी डिलीव्हरी बॉयला स्वतः ग्राहकापर्यंत ऑर्डर पोहोचवण्याचा कंटाळा आला म्हणून त्याने डुंजोची मदत घेतली ती घेतली. पण या आळशी डिलीव्हरी बॉयला फाइव्ह स्टारही गमावयचे नव्हते. म्हणून त्याने ग्राहकाला फोन करून डुंजोमार्फत आपण कॉफी डिलीव्हर केल्याचं सांगितलं आणि आपल्याला फाईव्ह स्टार द्या, अशी मागणी केली. ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात