जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बागेश्वर महाराजांचे डोळे पाणावतात तेव्हा, वाचा, नेमका काय आहे प्रकार? VIDEO

बागेश्वर महाराजांचे डोळे पाणावतात तेव्हा, वाचा, नेमका काय आहे प्रकार? VIDEO

बागेश्वर महाराजांचे डोळे पाणावतात तेव्हा, वाचा, नेमका काय आहे प्रकार? VIDEO

सध्या बागेश्वर धाममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय.

  • -MIN READ Trending Desk Madhya Pradesh
  • Last Updated :

    छतरपुर (मध्यप्रदेश), 6 मार्च : मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथील पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सातत्यानं त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते कधी हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत वक्तव्य करतात, तर कधी वेगवेगळे चमत्कार दाखवतात. आता मात्र ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या बागेश्वर धाममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. ज्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वधू आणि बागेश्वर महाराज बोलताना दिसतात, व दोघांचे डोळे पाणावले असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. काही दिवसांपूर्वी बागेश्वर धाममध्ये सामूहिक विवाहसोहळा पार पडला, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, बागेश्वर धाममध्ये काही जोडप्यांचं लग्न होत आहे, त्यातील एक वधू बागेश्वर महाराज यांच्याबद्दल म्हणते की, ‘बागेश्वर महाराजांनी मला खूप मदत केली. कारण माझे वडील या जगात नाहीत.’ पण त्यानंतर बागेश्वर महाराजांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय. अनेकजण त्यावर कमेंटसुद्धा देतायत. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट देताना लिहिलं आहे की,‘मी तुम्हाला आज माझ्या स्वप्नात पाहिलं आहे.’ तर, आणखी एका यूजरनं लिहिलं की,’महाराजांनी आज मन आनंदी केलं.’ या शिवाय एका यूजरन कमेंट केली की, ‘तुमच्याबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे.’ हा व्हिडिओ neer_4108 च्या इन्स्टा अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय. रुग्णालयाऐवजी गेली बागेश्वर धाममध्ये, किडनीच्या आजाराने त्रस्त महिलेचा मृत्यू

    व्हिडिओमध्ये नेमकं काय?

    व्हिडिओमध्ये दिसते की जेव्हा वधू ‘बागेश्वर महाराजांनी मला खूप मदत केली. कारण माझे वडील या जगात नाहीत,’ असे बोलते तेव्हा हे ऐकून बागेश्वर महाराजांचे डोळे पाणावतात. बागेश्वर महाराज त्या वधूला म्हणतात, ‘कोण म्हणतंय की तुला वडिल नाहीत. आजपासून आम्ही तुझे वडील आहोत. तू येथे कधीही येऊ शकतेस, येथे राहू शकतेस, केवळ मीच नाही, तर बागेश्वर धाममधील जेवढे लोक आहेत ते सर्व तुझ्याच कुटुंबाचा भाग आहेत. आनंदी राहा मुली.’ यानंतर, बागेश्वर महाराज नवरदेवाला सांगतात की, ‘माझ्या मुलीला आनंदी ठेव. तिची कुठलीही तक्रार येऊ देऊ नको.’ हे ऐकून, वधूच्या डोळ्यांत अश्रू येतात.

    जाहिरात

    बागेश्वर धामचा हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून, तो अनेकांनी पसंत केला आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे बागेश्वर धाम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात