कॅनबेरा, 04 फेब्रुवारी : आपल्याकडे लाखो-करोडो रुपये आणि अलिशान घर, गाड्या असाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. सध्याच्या काळात अगदी मोजक्या लोकांचं हे स्वप्न नोकरी, व्यवसायाच्या माध्यमातून पूर्ण होतं. पण अगदी लाखात एक व्यक्ती मात्र नशीबवान असते. ती एका रात्रीत लखपती, करोडपती किंवा अगदी अब्जाधीश होते. सध्या ऑस्ट्रेलियातील एक महिला अशाचप्रकारे नशीबवान ठरली आहे. तिला 3.2 अब्ज रुपयांची लॉटरी लागली आहे. आपल्याला जॅकपॉट लागला आहे, या गोष्टीवर या महिलेचा कित्येक तास विश्वास बसत नव्हता. पण नंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. गमतीचा भाग म्हणजे तिला लॉटरीवाल्याने जेव्हा यासंदर्भात सांगण्यासाठी फोन केला तेव्हा ती समोरच्या व्यक्तीवर जाम संतापली. काही तासानंतर तिचा संताप निवळला. हा सर्वप्रकार नेमका काय आहे, ते जाणून घेऊया. आपण श्रीमंत व्हावं, असं कोणाला वाटत नाही. जवळपास प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, जर माझ्याकडे कोट्यवधी किंवा अब्जावधी रुपये असते तर मी माझं आयुष्य आरामात घालवू शकलो असतो. केवळ माझेच नाही तर माझ्या सात पिढ्यांचे आयुष्य आनंदात गेले असते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी अब्जवधी रुपयांची लॉटरी लागली तर ? खरंतर तुमचा सर्वप्रथम यावर विश्वास बसणार नाही. पण जेव्हा विश्वास बसेल तेव्हा तुम्ही आनंदाने बेभान व्हाल. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेसोबत काहीसा असाच प्रकार घडला. तिला अब्जावधी रुपयांची लॉटरी लागली. पण जेव्हा तिला ही बातमी सांगण्यासठी लॉटरीवाल्यांनी फोन केला तेव्हा ती त्यांच्यावर संतापली. पण काही वेळाने तिचा संताप निवळला आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. माध्यमातील वृत्तानुसार, उत्तर व्हिक्टोरियामधील एका महिलेनं ऑनलाइन लॉटरीचे तिकिट खरेदी केले होते. एकेदिवशी रात्री लॉटरीचा निकाल जाहीर झाला. तेव्हा तिला जॅकपॉट लागला होता. तिनं लॉटरीचं पहिलं बक्षीस जिंकलं होतं. हे बक्षीस सुमारे 3.2 अब्ज रुपये होते. वृत्तानुसार, आपण तीन अब्जाहून जास्त रकमेची लॉटरी जिंकली आहे, यावर त्या महिलेचा विश्वास बसण्यास काही तास लागले. ``मी लॉटरीत इतके पैसे कसे जिंकू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता,`` असं त्या महिलेनं सांगितलं. तुम्ही या अब्जावधी रुपयांचं काय करणार असा प्रश्न विचारला असता, त्या महिलेनं सांगितलं, ``सर्वप्रथम मी माझं गहाण असलेलं घर या पैशातून सोडवणार आहे. त्यानंतर कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी मी नोकरीसुद्धा सोडणार आहे.`` दरम्यान, आपल्याला एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी लागली आहे, यावर या महिलेचा कित्येक तास विश्वास बसत नव्हता. त्या दिवशी रात्री लॉटरी वाल्यांनी महिलेला फोन करून तुम्ही अब्जावधी रुपयांची लॉटरी जिंकली आहे, असं सांगताच ही महिला त्यांच्यावर संतापली. कुणीतरी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देतंय किंवा कुणीतरी आपल्या अकाउंटमधून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्या महिलेला वाटलं. त्यामुळे गैरसमजातून महिलेनं लॉटरीवाल्यांना फैलावर घेतले, त्यानंतर ती झोपून गेली. सकाळी झोपेतून उठल्यावर तिला पुन्हा लॉटरीवाल्यांचा फोन आला. तेव्हा तिचा थोडा थोडा विश्वास बसू लागला. तुम्ही खरं बोलताय का, हा प्रश्न तिनं लॉटरीवाल्यांना अनेकवेळा विचारला. जेव्हा तिला विश्वास बसला की तिनं खरंच अब्जावधी रुपयांची लॉटरी जिंकली आहे, तेव्हा तिला क्षणभर धक्का बसला. ऑस्ट्रेलियातील महिलेनं जिंकलेली ही आतापर्यंत सर्वात मोठी लॉटरी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.