नवी दिल्ली, 06 जून : जगभरात अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत. ज्याच्याविषयी आपण कधी ऐकलं नसेल किंवा त्याविषयी काही गुप्त रहस्य माहित नसेल. एवढंच नाही तर काही अशीही रहस्य आहेत जे वैज्ञानिकही आजपर्यंत उलगडू शकले नाहीत. अशाच एका ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांचे अस्तित्व आजही एक रहस्य आहे. त्या ठिकाणांबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे मात्र काही गोष्टी काल्पनिकच असल्याच्या म्हटल्या जातात.
कोणतं आहे हे ठिकाण हे रहस्यमयी ठिकाण आहे अटलांटिस शहर. अटलांटिस शहराबद्दल असं म्हटलं जातं की ते भारतापेक्षा खूप मोठं शहर होतं, परंतु हे शहर समुद्रात बुडून गेलं. या शहराच्या सौंदर्यापासून ते आकारमानापर्यंत अनेक दावे केले जातात. असंही म्हटलं जातं की, हे एक मोठं शहर होतं आणि त्याचा आकार आशियापेक्षा मोठा होता, परंतु आता हे शहर अस्तित्वात नाही. शास्त्रज्ञ अजूनही या शहराचा शोध घेत आहेत. संशोधनातून काय समोर आलं? अटलांटिस शहराबाबत अनेकवेळा संशोधन करण्यात आले, परंतु अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही. द मिस्ट्री ऑफ अटलांटिस सारख्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की एक दिवस त्याची माहिती समोर येईल आणि अनेक वेळा त्याच्याशी संबंधित पुरावे सापडले आहेत. बहुतेक अहवालांमध्ये याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि ही केवळ कल्पनारम्य असल्याचं मानले जात आहे. मोबाईल जास्त वेळ वापरल्यास खरोखरच आंधळेपण येतं का? काय आहे सत्य या रहस्यमयी शहराचे वर्णन ग्रीक तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ प्लेटोच्या कथांमध्ये आढळते. अटलांटिक महासागरातील एका बेटावर अटलांटिस वसले होते असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक संशोधनातून वेगवेगळी माहिती समोर आली आहे. अद्याप अटलांटिस कधीही अस्तित्वात असल्याचा कोणताही भक्कम पुरावा सापडला नाही. आतापर्यंत पृथ्वीवर अटलांटिसचे कोणतेही शहर असल्याचा पुरावा नाही. शहराविषयी माहिती कुठून आली? या शहराची माहिती प्लेटोमुळे आहे. सुमारे 2300 वर्षांपूर्वी मसूर ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोने या शहराबद्दल सांगितलं होतं. या आधारावर ग्रीक तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ प्लेटो यांच्या कथांमध्ये या शहराचा उल्लेख आढळतो. त्यावेळी अटलांटिस हे पृथ्वीवरील सर्वात आनंदी ठिकाण मानले जात असे. प्लेटो नुसार लिबिया आणि आशियापेक्षा खूप मोठे बेट असे त्याचे वर्णन केले गेले आहे.