जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्वत:च काढलेली 90 कोटींची पेंटिग कलाकाराने जाळली, कारण ऐकून हैराण व्हाल

स्वत:च काढलेली 90 कोटींची पेंटिग कलाकाराने जाळली, कारण ऐकून हैराण व्हाल

स्वत:च काढलेली 90 कोटींची पेंटिग कलाकाराने जाळली, कारण ऐकून हैराण व्हाल

यूकेमधले प्रसिद्ध चित्रकार डोमीन स्टीवेन यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः काढलेली काही चित्रं जाळून टाकली

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 14 ऑक्टोबर : व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याचे विचार वेगवेगळे असतात. त्यातही ती व्यक्ती कलाकार असेल, तर त्याच्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये लहरीपणा जास्त असू शकतो. जगभरातल्या कलाकारांचं आयुष्य पाहिलं तर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवेल. यूकेमधल्या एका कलाकारानेही आपल्या वागण्यातून हे सिद्ध केलं आहे. त्याने स्वतः काढलेली चित्रं जाळून टाकली आहेत. यूकेमधले प्रसिद्ध चित्रकार डोमीन स्टीवेन यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः काढलेली काही चित्रं जाळून टाकली. या चित्रांची किंमत जवळपास 90 कोटी रुपयांपर्यंत होती असं सांगण्यात येतंय. डोमीन स्टीवेन यांचं नाव जगभरातल्या सर्वांत उत्तम चित्रकारांमध्ये घेतलं जातं; मात्र त्यांनी असं केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. डोमीन स्टीवेन 57 वर्षांचे असून ते त्यांच्या पोल्का डॉट्स कलाकृतींसाठी खास ओळखले जातात. त्यापैकीच काही सुंदर कलाकृतींचे तुकडे करून त्यांनी ते जाळून टाकले. जाळलेल्या कलाकृतींची किंमत 10 मिलियन युरो म्हणजे 90 कोटी रुपयांच्या आसपास आहे, असं सांगितलं जातंय. त्यांच्या या चित्रमालिकेला ‘द करन्सी’ असं नाव देण्यात आलं होतं. त्यांनी ज्या कलाकृतींच्या मूळ प्रती जाळून टाकल्या आहेत, त्या NFT म्हणजेच नॉन फंजिबल टोकन स्वरूपात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. स्वतःच्या कलाकृती जाळून टाकण्यामागे डोमीन यांचं खास कारण आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, Newport Street Galleryमध्ये त्यांनी स्वतःच्या कलाकृती एक एक करून जाळल्या. या घटनेचं लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं. त्यांचं हे अभियान कलाकृती NFT करण्याच्या विरोधात आहे. त्यासाठीच त्यांनी त्यांची चित्रं जाळली आहेत. डोमीन यांची चित्रं बाळगणाऱ्यांना जुलै 2021मध्ये ती चित्रं मूळ स्वरूपात किंवा NFT स्वरूपात ठेवण्याचा पर्याय देण्यात आला. NFT म्हणजे Non-Fungible Token. सोप्या भाषेत सांगायचं, तर या कलाकृती मूळ स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. 10 हजार जणांनी चित्रं खरेदी केली होती. त्यापैकी जवळपास निम्या जणांनी ती चित्रं NFT स्वरूपात ठेवण्याचा पर्याय स्वीकारला होता. ज्यांनी NFT स्वरूपात चित्र खरेदी केली होती, त्यांच्या मूळ प्रती जाळून टाकण्यात येतात. त्याआधी खरेदीदारांना कळवण्यात येतं. त्याच उद्देशानं डोमीन यांनी ही चित्रं जाळली आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात